शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या वस्त्यांमधील उद्योगांची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 23:32 IST

पूर्व नागपुरातील अनेक दाट लोकवस्ती असलेल्या वस्त्यांमध्ये विविध उद्योग सुरू आहेत. यामुळे प्रदूषण पसरत आहे. परिसरातील नागरिकांना त्यामुळे त्रास होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाटी महावितरण आणि एसएनडीएलची एक संयुक्त समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालाच्या आधारावर कारवाई केली जाईल.

ठळक मुद्देमहावितरण आणि एसएनडीएलची संयुक्त समिती गठित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्व नागपुरातील अनेक दाट लोकवस्ती असलेल्या वस्त्यांमध्ये विविध उद्योग सुरू आहेत. यामुळे प्रदूषण पसरत आहे. परिसरातील नागरिकांना त्यामुळे त्रास होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाटी महावितरण आणि एसएनडीएलची एक संयुक्त समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालाच्या आधारावर कारवाई केली जाईल.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शहरात जनसंवाद कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. २४ डिसेंबर रोजी सतरंजीपुरा झोनमध्ये आयोजित जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी तक्रार केली होती की, वस्त्यांमध्ये उद्योग स्थापित आहेत. एकट्या सतरंजीपुरा झोनमध्ये असे ३५ उद्योग आहेत जे अवैध आहेत. यामुळे लोकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. याअंतर्गत महावितरणचे अधीक्षक अभियंता मनीष वाठ यांनी प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठित केली आहे. या समितीत चार सदस्य आहे. यात महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र गिरी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता कुलदीपक भस्मे, एसएनडीएलचे राजेश तुरकर आणि गौरव गुप्ता यांचा समावेश आहे.समितीला तीन दिवसात परिसराची तपासणी करून अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. या समितीला परिसरात कुठे-कुठे अवैध वीज कनेक्शन आहे. घरगुती वीज कनेक्शन घेऊन उद्योग चालविले जात आहे, याची तपासणी करायची आहे. अशा अवैध वीज कनेक्शनचा पुरवठा बंद करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर