शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

वचनबद्धता न पाळणाऱ्या विकासकांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 22:35 IST

अनेकदा झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत विकासकांकडून वचनबद्धता पाळण्यात येत नाही. यामुळे झोपडपट्टीधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.

ठळक मुद्देशासन विशेष समिती गठित करणार : परिषदेत गृहनिर्माण मंत्र्यांचे आश्वासन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अनेकदा झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत विकासकांकडून वचनबद्धता पाळण्यात येत नाही. यामुळे झोपडपट्टीधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. यासंदर्भात विधिमंडळ सदस्यांचा समावेश असलेली विशेष समिती गठित करण्यात येईल व अशा विकासकांची छाननी करुन चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जयंत पाटील यांनी विधान परिषदेत शुक्रवारी केली.राष्ट्रवादीचे किरण पावसकर यांनी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत होत असलेल्या विविध गैरप्रकारांचा मुद्दा लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला. प्रकल्प रखडला की विकासकांकडून झोपडपट्टीधारकांना भाडे देण्यात येत नाही व अनेक जण १० ते १५ वर्षांपासून हक्काच्या घरांपासून वंचित राहिले आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले. विकासकाने वचनबद्धता पूर्ण केलीच पाहिजे. असे न करणाºया विकासकांची छाननीच करण्यात येईल. अधिकारी एकमेकांना सामील असल्यामुळे या समितीमध्ये त्यांच्यासमवेत विधिमंडळातील सदस्यदेखील असतील. ८ ते १० जणांची ही समिती छाननी करेल व अहवाल सादर करेल, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. मागील काही काळापासून गृहनिर्माण क्षेत्रात काहिसे थंड वातावरण आहे. परंतु त्यासाठी गुंतवणूकदार व विकासकांत विश्वासदेखील निर्माण करण्याची आवश्यकता आहे. या योजनेत कुठलाही गैरप्रकार होऊ दिला जाणार नाही व सरकार गरीब जनतेसोबत असेल. आमचे सरकार हे बिल्डरांच्या बाजूने जाणारे नाही, असा चिमटादेखील त्यांनी काढला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलVidhan Parishadविधान परिषद