प्रचाराचे अवैध बॅनर उतरवले
By Admin | Updated: April 29, 2015 02:46 IST2015-04-29T02:46:02+5:302015-04-29T02:46:02+5:30
नागपूर महापालिका कर्मचारी सहकारी बँकेची ३ मे रोजी निवडणूक होत आहे. निवडणूक प्रचाराच्या धुंदीत सर्वच ...

प्रचाराचे अवैध बॅनर उतरवले
नागपूर : नागपूर महापालिका कर्मचारी सहकारी बँकेची ३ मे रोजी निवडणूक होत आहे. निवडणूक प्रचाराच्या धुंदीत सर्वच पॅनेलने मनपाच्या केंद्रीय कार्यालय परिसरात प्रचाराचे अवैध बॅनर व पोस्टर्स लावलेले होते. या बाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच याची दखल घेत महापौर प्रवीण दटके यांनी आदेश दिल्याने मंगळवारी अवैध बॅनर्स व पोस्टर्स हटविण्यात आले.
मुख्यालयाच्या प्रवेश व्दारासोबतच आयुक्तांच्या कक्षाबाहेरही असे पोस्टर्स लावण्यात आले होते. अवैध बॅनर्स व पोस्टर्स विरोधात कारवाई करणाऱ्या महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु महापौरांच्या निर्देशानंतर त्यांना कारवाई करावी लागली.
कर्मचारी सहकारी बँकेची निवडणूक सर्वच पॅनलने प्रतिष्ठेची केली आहे. यात ७४ उमेदवार रिंगणात असून मनपातील शिक्षक व कर्मचारी असे ५२४५ मतदार आहेत. या बँकेवर २१ संचालक निवडून द्यावयाचे आहेत. लोकक्रांती पॅनलचे १४ संचालक आहेत. वेगवेगळ्या पाच पॅनलने एकत्र येत उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून उमेदवार उभे केले आहेत. सध्या या पॅनलचे तीन संचालक आहेत. सोबतच कर्मचारी -शिक्षक आघाडी पॅनल व संघर्ष पॅनल या निवडणूक ंिरंगणात आहेत.
सर्वांच पॅनलच्या प्रतिनिधींनी कार्यालयात प्रचार सुरू करून प्रसिद्धी पत्रके व जाहीरनामे वितरित केले. कामकाज सोडून प्रचाराच्या कामात कर्मचारी लागल्याने कामकाजावरही परिणाम होत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)