विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासाचे नवे तंत्र सादर

By Admin | Updated: April 23, 2016 03:14 IST2016-04-23T03:14:29+5:302016-04-23T03:14:29+5:30

डॉ. स्मृति परमार मेमोरी अ‍ॅण्ड माईन्ड ट्रेनर प्रस्तुत लोकमत मिशन अ‍ॅडमिशन ‘समर कॅम्प एक्सपो -२०१६’चे

Introduce new techniques for mental development of the students | विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासाचे नवे तंत्र सादर

विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासाचे नवे तंत्र सादर

‘लोकमत’च्या मिशन अ‍ॅडमिशन ‘समर कॅम्प एक्सपो’ला प्रारंभ : विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी आवश्यक माहिती उपलब्ध
नागपूर : डॉ. स्मृति परमार मेमोरी अ‍ॅण्ड माईन्ड ट्रेनर प्रस्तुत लोकमत मिशन अ‍ॅडमिशन ‘समर कॅम्प एक्सपो -२०१६’चे शुक्रवारी झाशी राणी चौक येथील हिंदी मोर भवनात शुभारंभ झाला. या एक्सपोमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाशी संबंधित सर्व अद्ययावत माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शैक्षणिक बदलांनुसार विद्यार्थ्यांच्या गरजाही बदलत आहेत. यात विशेषत्वाने विद्यार्थ्यांची आधारभूत व व्यावहारिक अभ्यासक्षमता वाढविण्यावर जोर दिला जात आहे. या एक्स्पोमध्ये अशाच खूप साऱ्या संस्थांनी भाग घेतला आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, व्यक्तिमत्त्व विकास, भाषण क्षमता वाढविणारे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. काही संस्था अभ्यासाचे नवीन तंत्र घेऊन आल्या आहेत. या सोबतच नोकरपेशा दाम्पत्यामध्ये मुलांच्या सोयीनुसार शाळा, खेळ-खेळताना अभ्यास करणाऱ्या शाळाही या एक्सपोचे खास आकर्षण आहे.
शुक्रवारी दीप प्रज्वलित करून या एक्सपोचा शुभारंभ झाला. यावेळी मोठ्या संख्येत शिक्षण क्षेत्रातील विशेषज्ञ, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. हा एक्सपो सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला आहे. येथे सर्व संस्थांच्या स्टॉल्सवर पालक आणि विद्यार्थ्यांना नि:शुल्क माहिती व मार्गदर्शन केले जात आहे.

 

Web Title: Introduce new techniques for mental development of the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.