शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा अधिकार बजावा; राज ठाकरेंनी केले आवाहन
2
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
3
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
4
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
6
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
7
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
8
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
9
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
11
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
12
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
13
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
14
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
15
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
16
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
17
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
18
मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा 
19
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
20
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही

नागपुरात ‘ओयो’तील आंतरराज्यीय सेक्स रॅकेटचा भंडाफोड, पाच आरोपींना अटक, पाच मुलींची सुटका

By योगेश पांडे | Published: May 08, 2024 9:20 PM

हिंगणा मार्गावरील बालाजीनगरात ओयो हॉटेल यश-२४ आहे. तेथे देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. पोलिसांनी एका डमी ग्राहकाच्या माध्यमातून आरोपींशी संकेतस्थळावर संपर्क साधला.

नागपूर : ‘ओयो’च्या एका हॉटेलमधील आंतरराज्यीय सेक्स रॅकेटचा भंडाफोड करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार सुरू होता. पोलिसांनी या प्रकरणात हॉटेल संचालकासह पाच आरोपींना अटक केली आहे. तर विविध राज्यांतील पाच मुलींची सुटका केली आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.हिंगणा मार्गावरील बालाजीनगरात ओयो हॉटेल यश-२४ आहे. तेथे देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. पोलिसांनी एका डमी ग्राहकाच्या माध्यमातून आरोपींशी संकेतस्थळावर संपर्क साधला. आरोपींनी डमी ग्राहकाला मोबाईल क्रमांक दिला. त्यानंतर मुलींचे फोटो ग्राहकांना पाठवले. मुलीची निवड झाल्यानंतर डमी ग्राहकाला हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. दोन मुलींमध्ये सौदा झाला. आरोपींनी डमी ग्राहकाकडून पैसे स्वीकारताच पोलिसांनी छापा टाकला. तिथे दोन मुली सापडल्या. तर आणखी तीन मुली दुसऱ्या हॉटेलमध्ये होत्या. तेथे जात पोलिसांनी त्यांचीदेखील सुटका केली.

पोलिसांनी यश दिपकराव बलोदे (२०, भट्टीपुरा, चांदुरबाजार, अमरावती), शुभम बलवंत मालखेडे (२२, भट्टीपुरा, चांदुरबाजार, अमरावती), संकेत विष्णू तितरमारे (२५, हिंगणा रोड), मनोज अरूण खंडारे (३६, इंदिरा माता नगर) व सागर मधुकर बिजवे (३१, अचलपूर, अमरावती) यांना अटक केली. तर त्यांचे साथीदार मनोज अग्रवाल व राहुल यांचा शोध सुरू आहे. आरोपी ग्राहकांकडुन पैसे घेऊन तरुणींकडून देहव्यापार करवून घेत होते. आरोपींच्या ताब्यातुन सहा मोबाईलसह १ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बलोदे व मालखेडे हे यश-२४ हे हॉटेल चालवितात. पोलीस निरीक्षक कविता ईसारकर, प्रकाश माथनकर, सचिन बडीये, शेषराव राऊत, अजय पौनिकर, आरती चव्हाण, अश्विन मांगे, समीर शेख, कुणाल मसराम, नितीन वासने, कमलेश क्षीरसागर व पुनम शेंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.परराज्यातील मुलींना विमानाने तिकीटआरोपी अनेक दिवसांपासून वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवत होते. राहुल आणि गगन नावाच्या दलालांमार्फत तो परराज्यातून मुलींना वेश्याव्यवसायासाठी बोलवायचे. तरुणींना मुलींची विमानाची तिकिटे द्यायचे आणि राहण्याची व जेवणाची व्यवस्था करायची. संकेतस्थळाच्या माध्यमातून ते ग्राहकांशी संपर्क करायचे. तरुणींना प्रत्येक ग्राहकामागे अडीच ते तीन हजार रुपये देण्यात यायचे. उर्वरित रक्कम दलाल आणि आरोपी ठेवायचे. सुटका करण्यात आलेल्या तरुणी दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश येथील आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वी करारावर आणून वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhotelहॉटेलPoliceपोलिस