शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

नागपुरात ३ ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार

By आनंद डेकाटे | Updated: September 10, 2022 18:37 IST

देश-विदेशातून दोन हजारावर प्रतिनिधी येणार

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर येत्या ३ ऑक्टोबर रोजी नागपुरात सुरेश भट सभागृहात आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत देश -विदेशातून दोन हजारावर प्रतिनिधी सहभागी होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. गगन मलीक फाऊंडेशनचे अध्यक्ष गगन मलीक आणि माजी कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांनी शनिवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.

थायलंडच्या चेरनत्वन आंतरराष्ट्रीय मेडिटेशन सेंटरचे प्रमुख भदंत फ्रा मेधीमज्जीरोदम यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात येईल. थायलंडचे डॉ. पाेंगसांक टंगकाना हे बीजभाषण करतील. या परिषदेत वर्ल्ड अलायन्स बुद्धिस्टचे अध्यक्ष भदंत पोर्नचाईपीन्यापोंगे, भदंत महा आर्यन, मास्टर मिचेल ली (जर्मनी), कॅप्टन नट्टाकिट, टिथीरड हेंगसाकुल,पटचारपीमोल, उषा खोराना, उट्टीचाई वाेरासिंग, मिथीला चौधरी (थायलंड), डॉ. थीम क्वांग (जर्मनी) यांच्यासह डॉ. सुखदेव थाेरात, भंते विमलकिर्ती गुणसिरी, डॉ. यशवंत मनोहर, प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. रुपाताई बोधी, डॉ. विमल थोरात आदी मार्गदर्शन करतील.

तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेयरमन माजी खासदार विजय दर्डा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, एड. सुलेखा कुंभारे, सिद्धार्थ हत्तीमारे यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप होईल. पत्रपरिषदेला नितीन गजभिये, प्रा. वंदना इंगळे, प्रा. प्रवीण कांबळे, डॉ. नीरज बोधी, प्रकाश कुंभे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर