शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

नागपुरात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 21:39 IST

: शहरातील पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी रात्री जारी करण्यात आले. एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेला अजनीचा पोलीस उपनिरीक्षक राजेश ठाकूर याच्यामुळे हे बदलीचे वादळ शहर पोलीस दलात धडकले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी रात्री जारी करण्यात आले. एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेला अजनीचा पोलीस उपनिरीक्षक राजेश ठाकूर याच्यामुळे हे बदलीचे वादळ शहर पोलीस दलात धडकले.बुधवारी रात्री ठाकूरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. ज्या पोलिस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी लाच घेताना पकडला गेला, त्या ठाण्यातील ठाणेदाराची तातडीने बदली करण्यात यावी, असे आदेश दोन महिन्यांपूर्वी पोलीस महासंचालकांनी काढले होते. त्यामुळे ठाकूरला लाच घेताना पकडल्यानंतर शहर पोलिस दलात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वादळ येणार, अशी चर्चा सुरू झाली. त्यानुसार शुक्रवारी उशिरा रात्री अजनीचे ठाणेदार संतोष खांडेकर यांच्यासह शहरातील पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश काढण्यात आले. नवीन आदेशानुसार खांडेकर यांची गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या जागेवर कपिलनगरचे ठाणेदार प्रदीप रायण्णावार यांना नियुक्त करण्यात आले. तर कपिलनगरचे ठाणेदार म्हणून गुन्हे शाखेचे मुख्तार शेख यांना नेमण्यात आले. कंट्रोल रूममधून काढून प्रभाकर मत्ते यांना वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आली. तर, बापू ढेरे यांना गुन्हे शाखेच्या आर्थिक सेलमध्ये नियुक्ती देण्यात आली.अनेकांची निराशा, काहींना अभयशहरातील काही पोलीस ठाण्यातील कारभार अंदाधुंद झाला आहे. काहीजण प्रीतीच्या गोतावळ्यात सापडले असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांची बदली होईल आणि ठाणेदार म्हणून आपली वर्णी लागेल, असा काही वरिष्ठ निरीक्षकांचा अंदाज होता. त्यासाठी ते आस लावून बसले होते. मात्र त्यांना ठाणेदारकी देण्याऐवजी वाळीत पडलेल्या दोघांचे पुनर्वसन केले गेले. काहींना पुन्हा अभय मिळाल्याने ठाणेदारकीसाठी आस लावून बसलेल्या अनेकांची निराशा झाली आहे.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसTransferबदली