खंडणी प्रकरणात शीतलला अंतरिम जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST2021-06-20T04:07:52+5:302021-06-20T04:07:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - डॉक्टरला मुलांच्या अपहरणाची धमकी देऊन एक कोटी रुपयांची खंडणी मागणारे पत्र पाठविणारी शीतल ईटनकर ...

Interim bail to Shital in ransom case | खंडणी प्रकरणात शीतलला अंतरिम जामीन

खंडणी प्रकरणात शीतलला अंतरिम जामीन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - डॉक्टरला मुलांच्या अपहरणाची धमकी देऊन एक कोटी रुपयांची खंडणी मागणारे पत्र पाठविणारी शीतल ईटनकर हिला आज न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला.

कोविड उपचारांच्या निमित्ताने डॉ. तुषार पांडे यांच्या संपर्कात आलेल्या शीतलला पांडे यांची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिच्या डोक्यात पत्र लिहून खंडणी मागण्याची कल्पना आली. आपण किती मोठा गुन्हा करीत आहो, हे दुर्लक्षित करून शीतलने खंडणीसाठी चक्क पत्र लिहिले आणि डॉक्टरकडे ते कुरिअरने पाठविले. डॉ. पांडे यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवताच बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या प्रकरणाची सलग चार दिवस कसून चाैकशी केली. या दरम्यान, कुरिअरमध्ये आलेल्या पाच महिलांची चाैकशी करण्यात आली. त्यानंतर शीतलला बेलतरोडी पोलिसांनी बुधवारी अटक केली. तिच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने तिला पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला अंतरिम जामीन मंजूर केला.

---

कुटुंबीयांना मानसिक त्रास

उच्चशिक्षित आणि सधन कुटुंबातील शीतलवर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू आहे. तिला अद्यापही या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात आलेले नाही. तिच्या सासरची आणि माहेरची मंडळी सरळमार्गी आहे. तिच्या या कृत्यामुळे तिच्या कुटुंबीयांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे.

---

Web Title: Interim bail to Shital in ransom case