प्रत्येक वर्गाचे हित लक्षात घेणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:07 IST2021-06-26T04:07:54+5:302021-06-26T04:07:54+5:30
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांच्या ६१ व्या जन्मदिनानिमित्त एक ऑनलाईन समारंभ ...

प्रत्येक वर्गाचे हित लक्षात घेणे गरजेचे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांच्या ६१ व्या जन्मदिनानिमित्त एक ऑनलाईन समारंभ कामठीतील समाजकार्य महाविद्यालयात आयोजित केला होता. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात उपस्थित होते. त्याचबरोबर माजी राज्यसभा खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, कृष्णा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, आमदार अभिजित वंजारी, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, डॉ. राजश्री मेश्राम, डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे, समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रुबिना अन्सारी उपस्थित होते. यावेळी डॉ. मिश्रा म्हणाले मेश्राम यांनी समाजात चेतना निर्माण केली आहे. डॉ. मुणगेकर यांनी त्यांना आंबेडकरी आंदोलनाचा एक महत्वपूर्ण कार्यकर्ता असल्याचे म्हणाले. वंजारी यांनी त्यांच्या प्रशासकीय कार्याची प्रशंसा केली. प्रसंगी डॉ. थोरात म्हणाले प्रशासकीय कार्य करताना डॉ. मेश्राम यांनी प्रत्येक वर्गाचे हित साधले जाईल यावर लक्ष दिले. मेश्राम हे उत्तम प्रशासकीय अधिकारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले. कार्यक्रमासाठी सिद्धांत मेश्राम, रचित मेश्राम, डॉ. प्रवीण घोसेकर यांचे सहकार्य लाभले.