पाच नामवंत अभिनेत्रींशी सखींचा संवाद

By Admin | Updated: October 22, 2015 04:47 IST2015-10-22T04:47:56+5:302015-10-22T04:47:56+5:30

लोकमत सखी मंचच्यावतीने मनमोकळा संवाद अंतर्गत २४ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजता विष्णुजी की रसोई,

Interaction with five prominent actresses | पाच नामवंत अभिनेत्रींशी सखींचा संवाद

पाच नामवंत अभिनेत्रींशी सखींचा संवाद

नागपूर : लोकमत सखी मंचच्यावतीने मनमोकळा संवाद अंतर्गत २४ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजता विष्णुजी की रसोई, रामदासपेठ येथे गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मराठी चित्रपट, मालिका, नाटक या सर्वच क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा स्वतंत्रपणे उमटविणाऱ्या या सर्व नायिका सखींशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत. ‘सेल्फी’ या नाटकासाठी नागपूरला आलेल्या या सर्व अभिनेत्री विशेष वेळ काढून सखींना भेटायला येणार आहेत.
या कार्यक्रमासाठी सर्व सखी मंच सदस्य कुटुंबासह आमंत्रित आहेत. सखींनी येण्यापूर्वी खाली दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर एसएमएसने संदेश करावा. याशिवाय उपस्थित सखी मंच सदस्यांपैकी पाच सखींची लकी ड्रॉ द्वारे निवड करून त्यांना या पाचही अभिनेत्रींसोबत चहापानाचा आनंद घेता येणार आहे. कार्यक्रम अगदी दुपारी १ वाजता सुरू होणार असून २.३० वाजता संपणार आहे. खाली दिलेल्या फोन नंबर्सवर कृपया एसएमएसने संदेश द्यावा. क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. ९८५०३०४०३७, ९९२२९१५०३५, ९८२२४०६५६२, ९९२२९६८५२६ अधिक माहितीकरिता नेहा जोशी यांच्याशी २४२३५२७ यावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Interaction with five prominent actresses