नागपूर रेल्वेस्थानकावर परप्रांतीय महिला चोरांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:28 PM2017-11-17T23:28:57+5:302017-11-17T23:34:51+5:30

प्रवाशांचे साहित्य पळविणाऱ्या तीन महिलांना रेल्वे सुरक्षा दलाने मुद्देमालासह रंगेहाथ अटक करून त्यांना लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले केले आहे.

Inter state women thieves arrested at Nagpur railway station | नागपूर रेल्वेस्थानकावर परप्रांतीय महिला चोरांना अटक

नागपूर रेल्वेस्थानकावर परप्रांतीय महिला चोरांना अटक

Next
ठळक मुद्देआरपीएफची कारवाईलोहमार्ग पोलिसांच्या केले स्वाधीन

आॅनलाईन लोकमत
नागपूर : प्रवाशांचे साहित्य पळविणाऱ्या तीन महिलांना रेल्वे सुरक्षा दलाने मुद्देमालासह रंगेहाथ अटक करून त्यांना लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले केले आहे.
नंदिनी बादल लोंडे (२०), सारिका वीरु खडसे (४५) आणि यमुना ताथुराम खंडारे (८०) रा.भोपाळ , अशी आरोपी महिलांची नावे आहेत.
रेल्वे सुरक्षा दलाची महिला आरक्षक उषा तिग्गा, जवान अर्जुन सामंतराय हे शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या पेट्रोलिंग करीत असताना त्यांना तीन महिला संशयास्पदस्थितीत फिरताना दिसल्या. त्यांनी या महिलांची विचारपूस केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यांना आरपीएफ ठाण्यात आणून उपनिरीक्षक दिलीप कुमार यांच्यासमोर हजर करण्यात आले. महिलांकडील साहित्याची तपासणी करण्यात आली असता त्यात एक निळ्या रंगाची जीन्स कापडाची लेडिज पर्स, त्यात २१४५ रुपये रोख, पुणे ते नागपूर प्रवासाचे तिकीट होते. ओव्हरब्रीजवरून चढताना एका महिलेची पर्स चोरल्याची कबुली अटक केलेल्या आरोपी महिलांनी दिली. पर्समधील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता लागलीच सुनंदा विष्णू बोंडे (५३) रा. काळे ले-आऊट, गोधनी रोड, झिंगाबाई टाकळी या आरपीएफ ठाण्यात हजर झाल्या. त्यांनी आपली पर्स ओळखली. त्यानंतर मुद्देमालासह आरोपी महिलांना लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Web Title: Inter state women thieves arrested at Nagpur railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा