शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
4
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
5
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
6
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
7
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
8
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
9
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
10
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
11
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
12
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
13
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
14
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
15
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
16
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
17
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
18
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
19
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार

गुप्तचर आणि एटीएसकडून इरफान चाचू, कोडापेची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 1:11 AM

अजमेरजवळून अटक करून आणलेल्या कुख्यात इरफान चाचू आणि नरेंद्र कोडापे यांच्यासह अन्य आरोपींचे नक्षल कनेक्शन तपासण्यासाठी गुप्तचर यंत्रणा तसेच दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी दिवसभर चौकशी केली. दरम्यान, या आरोपींनी चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांपुढे बराच वेळ विसंगत माहिती देऊन टाइमपास केल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देपाचपावली ठाण्यात दिवसभर झाडाझडती : अजमेरमधून अटक केलेल्या आरोपींचे नक्षल कनेक्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अजमेरजवळून अटक करून आणलेल्या कुख्यात इरफान चाचू आणि नरेंद्र कोडापे यांच्यासह अन्य आरोपींचे नक्षल कनेक्शन तपासण्यासाठी गुप्तचर यंत्रणा तसेच दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी दिवसभर चौकशी केली. दरम्यान, या आरोपींनी चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांपुढे बराच वेळ विसंगत माहिती देऊन टाइमपास केल्याची माहिती आहे.कुख्यात मोहम्मद इरफान चाचू ऊर्फ शमी सिद्दीकी (वय ३८ ,रा. राजाराम ले-आऊट,जाफरनगर) आणि नरेंद्र मधुकर कोडापे (वय ३०, रा. शिवाजी वॉर्ड, वडसा), शेख इलियास ऊर्फ इल्लू शेख उमर (वय ३४ ,रा. गंजीपेठ), जफर खान ऊर्फ बग्गाकदीर ऊर्फ जहीर खान (वय ३०, रा. बंगाली पंजा), शहबाज शेख मुबारक (वय २९,रा. गंजीपेठ) यांच्यासह एकूण १७ जणांना पाचपावली पोलिसांनी अजमेर(राजस्थान)जवळ शुक्रवारी ताब्यात घेतले. त्यांना शनिवारी नागपुरात आणल्यानंतर नमूद आरोपींना अटक केली तर इतरांना सूचना देऊन सोडून दिले. इरफान चाचूचे सिमी कनेक्शन आणि कोडापेचे नक्षल कनेक्शन पोलिसांच्या आधीपासून रेकॉर्डवर असल्याने रविवारी दिवसभर त्यांच्या गुन्हे अभिलेखाची पाहणी केली. दरम्यान इरफान याच्याविरुद्ध मानकापूर, सावनेर व गिट्टीखदानमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. गिट्टीखदानमधील प्राणघातक हल्ला प्रकरणात चाचू याच्यासह नौशाद याच्याविरुद्ध मोक्काचीही कारवाई करण्यात आली होती. कोडापे याच्याविरुद्ध उमरेड अड्याळ व नागभीडमध्ये शस्त्रप्रतिबंधक कायद्यासह गुन्हे दाखल असल्याचे पोलीस सांगतात.इरफान व कोडापे या दोघांचे नक्षल कनेक्शन यापूवीर्ही उघडकीस आले आहे. त्यामुळे सोमवारी आयबी व एटीएसच्या अधिकाऱ्यांनीपाचपावली पोलीस ठाण्यात या दोघांची दिवसभर कसून चौकशी केली. माओवाद्यांबाबत माहिती काढण्याचा प्रयत्न केला. त्यातून काय पुढे आले, ते उशिरा रात्रीपर्यंत कळू शकले नाही. आरोपी सारखे टाळाटाळ करीत होते, अशी सूत्रांची माहिती आहे.

टॅग्स :terroristदहशतवादीnagpurनागपूर