शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री, आमदारांना संघाकडून आज ‘बौद्धिक’; शिंदे गटाबाबत निश्चितता नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 06:05 IST

भाजपच्या सर्व आमदारांना वर्गात येणे अनिवार्य; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित राहणार!

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संपूर्ण राज्य सरकार नागपूर मुक्कामी आहे. हा मुहूर्त साधून  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजपच्या सर्व मंत्री व आमदारांना ‘बौद्धिक’ देण्यात येणार आहे. मंगळवारी रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात हा उद्बोधन वर्ग होईल. या वर्गाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित राहतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

२०१४ सालापासून संघाकडून आमदारांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात अधिवेशनच न झाल्याने हा वर्ग झाला नव्हता. या माध्यमातून संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून संघ विचारधारा आणि सामाजिक क्षेत्रात कार्याबाबत बौद्धिक देण्यात येते.  

यंदादेखील हिवाळी अधिवेशनानिमित्त राज्यभरातील आमदार नागपुरात आले आहेत. त्यामुळे संघभूमीत येत असताना संघ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळावे अशी अनेकांची इच्छा होती.  यंदा संघाकडून उद्बोधन वर्गाचे आयोजन होणार की नाही, याबाबत आमदारांमध्ये संभ्रम होता. परंतु २७ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास या वर्गाचे आयोजन संघाकडून करण्यात आले आहे. शिंदे गटातील आमदार यावेळी राहणार का याबाबत निश्चितता नाही.

मार्गदर्शन कोण करणार याबाबत गुप्तता

या उद्बोधन वर्गात संघाकडून नेमके कोण मार्गदर्शन करणार याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.  संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी हा वर्ग घेतील की स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोरच मंत्री-आमदार उपस्थित राहतील याबाबतीत संघाकडून मौन साधण्यात आले आहे.

संघ विचार आणि अपेक्षांवर राहणार भर 

भाजपच्या एखाद्या मंत्र्याने कुठलीही गैरवर्तणूक केली तर ‘स्वयंसेवक’ बिघडला, अशी टीका होते. शिवाय विविध घटनांमुळे मंत्र्यांवर ताशेरेदेखील ओढण्यात येत आहेत. जनतेच्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. अशा स्थितीत आमदार व मंत्र्यांचे नेमके आचरण कसे हवे आणि जनहितासाठी कुठल्या बाबींमध्ये पुढाकार घ्यायला हवा, यावर उद्बोधन वर्गाचा भर राहणार आहे.

भाजप आमदारांना ‘बौद्धिक’ अनिवार्य   

यासंदर्भात पक्ष प्रतोदांनी नोटीस जारी केली आहे. भाजपच्या सर्व आमदारांना वर्गात येणे अनिवार्य करण्यात आले आहे. काही वर्षांअगोदर स्मृती मंदिर परिसरात न गेलेल्या सदस्यांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली होती. भाजपने यासंदर्भात आदेश काढले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयBJPभाजपा