राष्ट्रीय आरोग्य अभियानचे प्रस्ताव तीन दिवसांत तयार करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:11 IST2021-01-16T04:11:39+5:302021-01-16T04:11:39+5:30
नागपूर : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (एनयूएचएम) अंतर्गत असलेले प्रस्ताव तीन दिवसांत तयार करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी ...

राष्ट्रीय आरोग्य अभियानचे प्रस्ताव तीन दिवसांत तयार करण्याचे निर्देश
नागपूर : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (एनयूएचएम) अंतर्गत असलेले प्रस्ताव तीन दिवसांत तयार करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. एनयूएचएमअंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात ७५ हेल्थ पोस्ट तयार केले जात आहेत. यासंदर्भात महापौरांनी शुक्रवारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी उपरोक्त निर्देश दिले. शहरातील ज्या भागात लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्य व्यवस्था कमी आहे किंवा काहीच नाही, अशा ठिकाणी सर्वेक्षण करून हेल्थ पोस्टसाठी तातडीने जागेची निवड करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत महापौर यांच्यासह उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके, आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम, आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. संजय चिलकर, डॉ. विजय जोशी, टाटा ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. टिकेश बिसेन, डॉ. विंकी रुघवानी, डॉ. चरडे आदी उपस्थित होते.
महापौर तिवारी यांनी यापूर्वी शहरातील सीमावर्ती भागात ७५ हेल्थ पोस्ट तयार करण्याची घोषणा केली होती. आता या कार्याला गती मिळाली आहे. महापौरांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याबाबत १८ जानेवारी रोजी बैठक घेण्यात येईल.