युवा नेतृत्वामुळे संस्था मोठी होते ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:07 IST2021-06-27T04:07:15+5:302021-06-27T04:07:15+5:30
नागपूर, तरुण पिढी जेव्हा एखाद्या संस्थेचे नेतृत्व करण्यासाठी पुढे येते तेव्हा ती संस्था मोठी होते. शुभांकर पाटीलच्या रूपाने रोटरी ...

युवा नेतृत्वामुळे संस्था मोठी होते ()
नागपूर, तरुण पिढी जेव्हा एखाद्या संस्थेचे नेतृत्व करण्यासाठी पुढे येते तेव्हा ती संस्था मोठी होते. शुभांकर पाटीलच्या रूपाने रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिटला तरुण नेतृत्व मिळाले असून विविध सामाजिक उपक्रम राबवून ते रोटरी क्लबला देशपातळीवर नेऊन ठेवतील, असा आशीर्वाद २०२१-२२ चे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर रमेश मेहेर यांनी दिला.
रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिटच्या २०२१-२२ च्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा शनिवारी धनवटे सभागृहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून रमेश मेहेर उपस्थित होते. वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, नवनियुक्त क्लब अध्यक्ष शुभांकर पाटील, उपाध्यक्ष अक्षित खोसला, सचिव करण जोतवानी, कोषाध्यक्ष सार्थ गुगनानी तर मावळते अध्यक्ष रौनक कंदे, सचिव सना ओपाई यांच्यासह डिस्ट्रीक्ट सेक्रेटरी प्रकाश खेमचंदानी, एजी मंजुषा चकनलवार, एन्क्लेव चेअर किशोर राठी, क्लब एक्झेकीटीव्ह सेक्रेटरी व माजी अध्यक्ष अजय पाटील उपस्थित होते. रोटरीचे ज्येष्ठ सदस्य संग्रामसिंग भोसले, कपील बहारी, अरूण मित्तल, आलोक गोएंका, संजय मेश्राम यांनीही नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. संस्कृती पाटील व मंजुषा चकलनवार यांनी परिचय करून दिला. प्रास्ताविक रौनक कंदे यांनी केले तर करण जोतवानी यांनी आभार मानले.