१०५ नागरिकांच्या डाेळ्यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:08 IST2021-07-11T04:08:05+5:302021-07-11T04:08:05+5:30
चिचाळा : ग्रामपंचायत प्रशासन पाहमी (ता. भिवापूर) व बिरसा मुंडा आदिवासी महिला एज्युकेशन सोसायटी, अर्जुनी (मोरगाव) (जिल्हा गाेंदिया) यांच्या ...

१०५ नागरिकांच्या डाेळ्यांची तपासणी
चिचाळा : ग्रामपंचायत प्रशासन पाहमी (ता. भिवापूर) व बिरसा मुंडा आदिवासी महिला एज्युकेशन सोसायटी, अर्जुनी (मोरगाव) (जिल्हा गाेंदिया) यांच्या संयुक्त विद्यमाने पाहमी ग्रामपंचायत कार्यालयात नेत्र तपासणी शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात १०५ नागरिकांच्या डाेळ्यांची तपासणी करून गरजूंवर औषधाेपचार करण्यात आले.
यावेळी तज्ज्ञ डाॅक्टरांनी नागरिकांना डाेळ्यांचे विविध आजार, त्यावरील उपाय, घरगुती उपाय, आजार हाेऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर विस्तृत मार्गदर्शन केले. शिवाय, वृद्धांसह महिला व तरुणांच्या डाेळ्यांची बारकाईने तपासणी करून काहींना अल्पदारात चष्मे देण्यात आले तर काहींवर औषधाेपचार करण्यात आले. नेत्रतज्ज्ञ डाॅ. सचिन बोरेकर, डाॅ.धम्मदिप गोस्वामी व डाॅ. मयूर मिसाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी नागरिकांना सेवा प्रदान केली. यावेळी सरपंच विजय कारमोरे, हेमंत भोयर यांच्यासह, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, आशासेविका व नागरिक उपस्थित होते.