एनसीसी युनिटचे निरीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:11 IST2021-02-23T04:11:39+5:302021-02-23T04:11:39+5:30
नरखेड : एनसीसीच्या महाराष्ट्र बटालियन २० चे कमांडिंग ऑफिसर कर्नल अमाेद चंदना यांनी नुकतीच नरखेड शहरातील श्री पंढरीनाथ कला ...

एनसीसी युनिटचे निरीक्षण
नरखेड : एनसीसीच्या महाराष्ट्र बटालियन २० चे कमांडिंग ऑफिसर कर्नल अमाेद चंदना यांनी नुकतीच नरखेड शहरातील श्री पंढरीनाथ कला व वाणिज्य महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील संपूर्ण एनसीसी युनिटची पाहणी केली.
याप्रसंगी कर्नल अमाेद चंदना यांनी महाविद्यालयातील एनसीसी कॅडेटशी संवाद साधत चर्चा केली. यात त्यांनी कॅडेटला बी सर्ट, सी सर्ट परीक्षेची पूर्वतयारी, नेतृत्व गुण विकसित करणे, एसएसबी मुलाखतीची तयारी करणे यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर विस्तृत मार्गदर्शन केले. एनसीसी कॅडेटनी त्यांच्याशी मनमाेकळेपणाने चर्चा केली. याप्रसंगी प्राचार्य डाॅ. जयंत जवंजाळ, कॅप्टन डाॅ. समीर पाहुणे, प्रा.डाॅ. रामेश्वर पाठेकर यांच्यासह प्राध्यापक उपस्थित हाेते. एनसीसी कॅडेटने कमांडिंग ऑफिसर कर्नल अमाेद चंदना यांना मानवंदना दिली.