नाला खाेलीकरण कामांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:13 IST2021-03-04T04:13:47+5:302021-03-04T04:13:47+5:30
रामटेक : राज्य शासनाच्या जलसंधारण व जिल्हा परिषदेंतर्गत झालेल्या नाला खाेलीकरण कामांची पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. याप्रसंगी नगरधन-भंडारबाेडी जिल्हा परिषद ...

नाला खाेलीकरण कामांची पाहणी
रामटेक : राज्य शासनाच्या जलसंधारण व जिल्हा परिषदेंतर्गत झालेल्या नाला खाेलीकरण कामांची पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. याप्रसंगी नगरधन-भंडारबाेडी जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत असलेल्या सालईमेटा, चिचाळा व भंडारबाेडी गावांमध्ये खाेलीकरण झालेल्या कामांचे लाेकार्पण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, जि.प. सदस्य दुधराम सव्वालाखे यांची उपस्थिती हाेती.
नाला खाेलीकरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. शिवाय, पाण्याची पातळी वाढायला मदत झाल्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी पंचायत समिती सभापती कला ठाकरे, पंचायत समिती सदस्य भूषण हाेलगिरे, पिंकी राहटे, डाॅ. रामसिंग सहारे, नरेश बर्वे, सुशील रहाटे, शरद दडुरे, बबलू मडावी यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि गावकरी उपस्थित हाेते.