६५ प्रतिष्ठानांची तपासणी, ६५ हजार दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:08 IST2021-04-09T04:08:53+5:302021-04-09T04:08:53+5:30

नागपूर : महापालिकेच्या एनडीएसच्या पथकांनी गुरुवारी ६५ प्रतिष्ठानांची तपासणी केली. कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नऊ जणांकडून ६५ हजाराचा ...

Inspection of 65 establishments, recovery of 65 thousand fines | ६५ प्रतिष्ठानांची तपासणी, ६५ हजार दंड वसूल

६५ प्रतिष्ठानांची तपासणी, ६५ हजार दंड वसूल

नागपूर : महापालिकेच्या एनडीएसच्या पथकांनी गुरुवारी ६५ प्रतिष्ठानांची तपासणी केली. कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नऊ जणांकडून ६५ हजाराचा दंड वसूल केला.

लक्ष्मीनगर झोनच्या पथकाने सात प्रतिष्ठानांची तपासणी करून पाच हजार, धरमपेठ झोनअंतर्गत चार ठिकाणी तपासणी करून पाच हजार रुपये दंड वसूल केला. हनुमाननगर झोनच्या पथकाने दोन प्रतिष्ठानाची तपासणी केली. धंतोलीमध्ये १६ ठिकाणी तपासणी करून पाच हजार रुपये दंड वसूल केला. नेहरूनगरमध्ये सहा प्रतिष्ठानांची तपासणी केली. गांधीबाग झोनच्या पथकाने एका प्रतिष्ठानाची तपासणी केली. लकडगंजच्या पथकाने १४ प्रतिष्ठानांची तपासणी केली. आसीनगर पथकाने आठ ठिकाणी तपासणी करून २० हजार तर मंगळवारी झोनच्या पथकाने चार ठिकाणी तपासणी करून १५ हजार रुपये दंंड वसूल केला. पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Inspection of 65 establishments, recovery of 65 thousand fines