५८ प्रतिष्ठानांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:07 IST2021-04-06T04:07:31+5:302021-04-06T04:07:31+5:30

नागपूर : कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेच्या एनडीएसच्या पथकांनी सोमवारी ५८ प्रतिष्ठानांची तपासणी केली. चार जणांकडून २५ हजाराचा दंड ...

Inspection of 58 establishments | ५८ प्रतिष्ठानांची तपासणी

५८ प्रतिष्ठानांची तपासणी

नागपूर : कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेच्या एनडीएसच्या पथकांनी सोमवारी ५८ प्रतिष्ठानांची तपासणी केली. चार जणांकडून २५ हजाराचा दंड वसूल केला.

लक्ष्मीनगर झोनच्या पथकाने चार प्रतिष्ठानांची तपासणी केली. धरमपेठ झोनअंतर्गत पाच, हनुमाननगर झोनच्या पथकाने दोन प्रतिष्ठानांची तपासणी केली. धंतोलीमध्ये सात ठिकाणी तपासणी करून १५ हजार रुपये दंड वसूल केला. नेहरूनगरमध्ये तीन प्रतिष्ठानांची तपासणी केली. गांधीबाग झोनच्या पथकाने पाच प्रतिष्ठानांची तपासणी केली. लकडगंजच्या पथकाने १९ प्रतिष्ठानांची तपासणी करून पाच हजार रुपये दंड तर, आसीनगर झोनच्या पथकाने सहा प्रतिष्ठानांची तपासणी करून पाच हजार रुपये वसूल केले. मंगळवारी झोन पथकाने पाच ठिकाणी तपासणी केली. एनडीएस पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Inspection of 58 establishments