गवळीच्या 'फर्लो'वरील सुनावणी तहकूब

By Admin | Updated: March 2, 2017 05:02 IST2017-03-02T05:02:15+5:302017-03-02T05:02:15+5:30

मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने संचित रजा (फर्लो) मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली

Inquiry on the hearing of the absconding 'Fellows' | गवळीच्या 'फर्लो'वरील सुनावणी तहकूब

गवळीच्या 'फर्लो'वरील सुनावणी तहकूब


नागपूर : मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने संचित रजा (फर्लो) मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने बुधवारी या प्रकरणावरील सुनावणी शासनाच्या विनंतीवरून एक आठवडा तहकूब केली.
गवळीने रजेसाठी सुरुवातीला कारागृह उपमहानिरीक्षकाकडे अर्ज सादर केला होता. निवडणुकीचे दिवस असल्याचे कारण देऊन त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. या निर्णयाला गवळीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्याला २० मे २००८ रोजी अटक करण्यात आली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Inquiry on the hearing of the absconding 'Fellows'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.