शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कचरा घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 22:51 IST

भांडेवाडी येथे कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणाºया हंजर बायोटेक कंपनीच्या कचरा घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या स्तरावर समिती गठित करा, दोषी आढळून येणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करा व ३० दिवसात अहवाल सादर करा, असे आदेश शासनाचे उपसचिव सतीश मोघे यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: भांडेवाडी येथे कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणाºया हंजर बायोटेक कंपनीच्या कचरा घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या स्तरावर समिती गठित करा, दोषी आढळून येणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करा व ३० दिवसात अहवाल सादर करा, असे आदेश शासनाचे उपसचिव सतीश मोघे यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत.आमदार विकास ठाकरे यांनी अधिवेशनात भांडेवाडी येथील कचरा घोटाळ्याचा प्रश्न उपस्थित करून चौकशीची मागणी केली होती. नगरविकास मंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार उपसचिवांनी बुधवारी आदेश जारी केले.विकास ठाकरे व काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भांडेवाडी डम्पिंग येथे दोन महिन्यापूर्वी धाड घालून ट्रकमध्ये कचºयाऐवजी मोठ्या प्रमाणात माती आणि दगड आणले जात असल्याचे रंगेहात पकडले होते. महापालिकेत सुरू असलेला कोट्यवधी रुपयांचा कचरा घोटाळा यानिमित्ताने उघडकीस आणला होता. हंजर सोबतच कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या दोन कापण्याकडून कचºयाचा नावाखाली ट्रकमध्ये माती व दगड, वेस्ट मटेरियल आणून भांडेवाडी येथील डम्पिंग यार्ड येथे जमा करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला होता.असे आहेत निर्देश-भांडेवाडी येथील कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणाºया हजार बायोटक कंपनीकडून करण्यात आलेल्या गैरव्यवहारासंदर्भात चौकशी करून समितीच्या अभिप्रायासह ३० दिवसात अहवाल शासनाला सादर करा.-सन २००९ मध्ये हंजर बायोटेक कंपनीसोबत करार करण्यापूर्वी सदरची कंपनी असा प्रकल्प उभारण्यासाठी पात्र असल्याबाबत मनपाने सर्वसामावेशक पडताळणी केली होता का, याची चौकशी करावी.- २०१२ मध्ये आग लागल्यानंतर प्रकल्पाची क्षमता कमी झाली. मनपाने आकारलेल्या दंडाची रक्कम दिली नसताना कंपनीला टिपिंग फी कशी देण्यात आली याची चौकशी करावी.-हंजर बायोटेक कंपनीने मनपाची फसवणूक करून आजवर १८ कोटी ८९ लाख ८५ हजार ७ रुपयांची खोटी देयके उचलली. पूर्व परवानगीशिवाय यंत्रसामग्री परस्पर विकली. याबाबतच्या व्यवहाराची व कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी.-करारानुसार अटी व शर्तींचे पालन केले का, याची चौकशी करावी.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नnagpurनागपूर