शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव-भीमाप्रकरणी अवैधपणे अटक झाली असल्यास चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 05:46 IST

कोरेगाव-भीमा दंगलीप्रकरणी पुणे पोलिसांनी काही जणांना अवैधरीत्या अटक केली असल्यास तो चौकशीचा विषय आहे.

नागपूर : कोरेगाव-भीमा दंगलीप्रकरणी पुणे पोलिसांनी काही जणांना अवैधरीत्या अटक केली असल्यास तो चौकशीचा विषय आहे. आदिवासी संघर्षाला नक्षलवादाशी जोडणे, ही सरकारची भूमिका नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, असे मत केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी रविवारी येथे व्यक्त केले.‘आॅर्गनायझेशन फॉर राइट्स आॅफ ट्रायबल’च्या वतीने येथेएकता मेळावा झाला. त्यात दिल्ली येथील मानवाधिकार कार्यकर्त्या व माजी सॉलिसिटर जनरल इंदिरा जयसिंग, कामगार आयुक्त नरेंद्र पोयाम प्रमुख पाहुणे होते. भगत यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. आरक्षणाचा लाभ खऱ्या आदिवासींनाच मिळाला पाहिजे. खºया आदिवासींच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे आदिवासींचे अधिकार बळकावणाºयांना व त्यांना मदत करणाºया सरकारी अधिकाºयांवर कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. आदिवासींच्या अधिकारांसाठी कायदेशीर लढा देणारे अ‍ॅड. प्रतीक बोंबार्डे, अ‍ॅड. प्रदीप वाठोरे व अ‍ॅड. विकास कुलसुंगे यांचा सत्कार करण्यात आला.>कोरेगाव-भीमा प्रकरणी झालेली अटक चुकीचीकोरेगाव-भीमा प्रकरणात पाच जणांना झालेली अटक चुकीची आहे. सरकार कधीही कुणालाही नक्षलवादी घोषित करू शकते, असे चित्र यावरून निर्माण झाले. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप मान्य केला जाऊ शकत नाही. आजकाल बाबासाहेबांचे राज्यघटना निर्मितीमधील योगदान नाकारले जात आहे. त्यालाही उत्तर देणे गरजेचे आहे, असे जयसिंग म्हणाल्या.>देशात कायद्यांची हत्या - इंदिरा जयसिंगदेशात कायद्यांची हत्या होत असल्यामुळे प्रत्येकाने राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी लढा दिला पाहिजे. राज्यघटना हे एकच पवित्र पुस्तक आहे. त्याविना आपण कधीच प्रगती करू शकलो नसतो, असे इंदिरा जयसिंग यांनी मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले. सर्वोच्च न्यायालयात एकही अनुसूचित जाती/जमातीमधील न्यायमूर्ती नाही, हे आश्चर्यकारक आहे. न्यायदान प्रक्रियेत सर्वच जाती-धर्मातील विधिज्ज्ञांचा समावेश असणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालय स्वत:च्याच आदेशाचा सन्मान करीत नसल्याचे न्यायाधीश लोया मृत्यू प्रकरणात दिसून आले. या प्रकरणाचा योग्य तपास झाला पाहिजे. न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांमध्ये केंद्र सरकारचा हस्तक्षेप वाढत आहे. हे लोकशाहीसाठी चांगले लक्षण नाही, असेही त्या म्हणाल्या.