पशुधन योजनेतील गैरप्रकाराची चौकशी करा
By Admin | Updated: January 28, 2015 01:03 IST2015-01-28T01:03:59+5:302015-01-28T01:03:59+5:30
राज्य सरक ारच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत पशुधन आधारित शेती योजना राबविण्यात आली. शेतकऱ्यांना अनुदानावर गायींचे वाटप करण्यात आले.

पशुधन योजनेतील गैरप्रकाराची चौकशी करा
कृषी सभापतीचे निर्देश : ३० हजारांची गाय ४० हजारांत
नागपूर : राज्य सरक ारच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत पशुधन आधारित शेती योजना राबविण्यात आली. शेतकऱ्यांना अनुदानावर गायींचे वाटप करण्यात आले. यात गैरप्रकार झाल्याच्या तक्र ारी असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती आशा गायकवाड यांनी सोमवारी समितीच्या बैठकीत दिले.
पारशिवनी तालुक्यातील बोरी सिंगारती गावातील २५ लाभार्थीची या योजनेसाठी निवड करण्यात आली होती. यातील १३ लाभार्थींना गायी वाटप करताना त्यांच्या पसंतीनुसार खरेदी न करता अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार खरेदी करण्यात आली. वाटप करण्यात आलेल्य गायी दूध देत नसल्याच्या आरोप करीत सदस्य शिवकुमार यादव व मनोज तितरमारे यांनी चौकशीची मागणी केली . त्यानुसार समिती गठित करण्याचे निर्देश देण्यात आले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या शेतकरी गट योजनेतून हिंगणा, पारशिवनी, नागपूर व कामठी तालुक्यांना वगळण्यात आले आहे. या तालुक्यांचा योजनेत समावेश करण्याची मागणी सदस्यांनी केली. राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी योजना राबविल्या जातात. परंतु जिल्हा परिषद, पंचायत समिती वा ग्रामपंचायत समितीच्या सदस्यांना याची माहिती नसते. यावर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
कृषी समितीच्या बैठकांना तालुका कृषी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. सदस्य पद्माकर कडू , कृषी विकास अधिकारी सुबोध मोहरील, पशुसंवर्धन अधिकारी बाबा वाणी यांच्यासह समितीचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)