शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

रामभक्तांची अनाेखी हवाई सफर; रामनामाच्या गजरात भजन अन् हनुमंतांचे दोहे

By नरेश डोंगरे | Updated: January 21, 2024 23:15 IST

कोट्यवधी रामभक्तांनी अनेक वर्षे जे स्वप्न कुरवाळले ते प्रत्यक्षात अनुभवण्याची घटिका आता जवळ आली आहे. त्यामुळे रामभक्तांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

नागपूर : नागपूरच्या विमानतळावरून अयोध्येच्या दिशेने विमान झेपावले. या विमानात बसलेल्या एक दोघांचा अपवाद वगळता सर्वच प्रवासी रामभक्तीत तल्लीन झाले. हा प्रसंग होता फ्लाइटमधील. रविवारी दुपारी अयोध्येच्या दिशेने निघालेल्या नागपूर-नाशिक आणि इंदोरमधील रामभक्तांनी चक्क आकाशातच रामनामाचा गजर करीत हवाई प्रवास करण्याचा अनोखा अनुभव घेतला.

कोट्यवधी रामभक्तांनी अनेक वर्षे जे स्वप्न कुरवाळले ते प्रत्यक्षात अनुभवण्याची घटिका आता जवळ आली आहे. त्यामुळे रामभक्तांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. प्रत्येक जण शक्य होईल, त्या पद्धतीने आपली भक्ती, श्रद्धा आणि आनंद व्यक्त करीत आहे. अयोध्येतील मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी कोट्यवधी भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रामभक्त विमान कंपन्यांच्या मनमानी दरांना न जुमानता महागडे तिकीट घेऊन अयोध्येकडे झेपावत आहेत. या पार्श्वभूमीवर, देशभरातील विविध प्रांतांतील, असंख्य भाविकांसह नागपुरातीलही रामभक्तांनी आज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अयोध्येला जाण्यासाठी गर्दी केली. दुपारी १२:४५ वाजता इंदोर-लखनऊ मार्गे अयोध्येकडे हे विमान झेपावले. या विमानात मुंबई, पुणे, तर काही नाशिक येथील रामभक्तांचाही समावेश होता. पुढे त्यांना इंदोर विमानतळावर बसलेल्या रामभक्तांचीही साथ मिळाली आणि आकाशातून अयोध्येकडे झेपावलेल्या या विमानात लखनऊपर्यंत या प्रवासी भक्तांनी रामनामाचा गजर केला. महिला, पुरुष सर्वांनीच एक ताल, एक सुरात टाळ्यांचा ठेका धरत रामाचे भजन आणि हनुमंताचे दोहे गायले.

अत्यानंद ... भारावलेले... विलक्षण अनुभवभव्यदिव्य श्रीराम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होताना अयोध्येत उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. हे जेवढे अलाैकिक आहे. तेवढाच आज विमान प्रवासात आलेला अनुभव अत्यानंद देणारा आहे. नभात झालेला रामनामाचा गजर म्हणजे विलक्षण अनुभव होय, अशी भावना या अभूतपूर्व प्रकाराचे साक्षीदार ठरलेले रामभक्त अविनाश शेगावकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या