शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

इनोव्हाची उभ्या ऑटोरिक्षाला जोरदार धडक; अपघातात मेयोचे पाच डॉक्टर बचावले

By सुमेध वाघमार | Updated: November 25, 2023 12:42 IST

दिघोरी नाक्यावरील घटना, चार शाळकरी विद्यार्थी जखमी

नागपूर : उमेरड रोडवरील दिघोरी टोल नाक्यावर शनिवारी (दि. २५) सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान झालेल्या अपघातात मेयोचे पाच डॉक्टर बचावले. या अपघातात शाळेतील चार विद्यार्थी जखमी झाल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुसार, केंद्र शासनाच्या अत्यंत महत्त्वकांशी ‘आयुष्यमान भव’ मोहिमेंतर्गत भिवापूर येथे शनिवारी सकाळी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) सात वरीष्ठ निवासी डॉक्टरांची ड्युटी लावण्यात आली. ने-आण करण्यासाठी सिव्हिल सर्जन कार्यालयातून दोन वाहनाची व्यवस्था करण्यात आली.

इनोव्हा या वाहनात पाच वरीष्ठ निवासी डॉक्टर तर इंडिका वाहनात चार महिला निवासी डॉक्टर बसले. इनोव्हा वाहन उमरेड रोडवरील दिघोरी टोल नाक्यावर आले असताना चालकाने उभ्या ऑटोरिक्षाला जोरदार धडक दिली. यामुळे ऑटोरिक्षा उलटली. डॉक्टरही एकमेकांवर आदळले. त्याचवेळी मागून येत असलेल्या टिप्परने ब्रेक लावल्याने अनर्थ टळला.

इनोव्हामधील पाचही डॉक्टर बचावले. परंतु ऑटो उलटल्याने त्यातील शाळेतील चार विद्यार्थी जखमी झाले. या घटनेने आजूबाजूचे लोक धावून आले. त्यांनी इनोव्हा चालकाला मारहाण केली. डॉक्टरांच्या अंगावरही लोक धावून गेले.  डॉक्टर असल्याचे सांगत जखमी विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार दिले. परंतु लोकांमध्ये वाढता संताप पाहता पाचही डॉक्टरांनी तिथून पळ काढत एसटीने नागपूर गाठले.

टॅग्स :Accidentअपघातdoctorडॉक्टरnagpurनागपूरStudentविद्यार्थी