ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय
By Admin | Updated: July 8, 2015 02:53 IST2015-07-08T02:53:23+5:302015-07-08T02:53:23+5:30
राज्यातील युती सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांकरिता नॉन क्रिमीलेयरची मर्यादा सहा लाख असतानाही प्रतिपूर्ती योजनेची मर्यादा ४.५० लाख रुपये कायम ठेवली आहे.

ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय
नागपूर : राज्यातील युती सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांकरिता नॉन क्रिमीलेयरची मर्यादा सहा लाख असतानाही प्रतिपूर्ती योजनेची मर्यादा ४.५० लाख रुपये कायम ठेवली आहे. ओबीसी विद्यार्थ्यांप्रति सरकारने अन्यायकारक निर्णय घेतला आहे. सत्तेत नसताना केवळ मतांसाठी ओबीसींचा पुळका दाखविला. सत्तेत आल्यानंतर अन्याय करणारे निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सलील देशमुख यांनी केला.
ओबीसी विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात सलील देशमुख यांच्या नेतृत्वात मंगळवारी व्हेरायटी चौकातील गांधी पुतळ्याजवळ धरणे देण्यात आले. यावेळी युती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या धरणे आंदोलनात अनिल अहिरकर, अशोक काटले, ईश्वर बाळबुधे, शैलेंद्र तिवारी, अमित काकडे, जगदीश पंचबुधे, पंकज डहाके, निशिकांत काशीकर, सौरभ मिश्रा, मधुकर भावसार, अविनाश गोतमारे, प्रवीण कुंटे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)