महामेट्रोच्या नोकर भरतीत मागासवर्गीयांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:12 IST2021-08-24T04:12:07+5:302021-08-24T04:12:07+5:30

एससी, एसटी, ओबीसींच्या हक्काच्या जागा डावलल्या लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूरच्या महामेट्रोतर्फे झालेल्या नोकर भरती प्रक्रियेत आरक्षण धोरणांची ...

Injustice on Backward Classes in Mahometro Recruitment | महामेट्रोच्या नोकर भरतीत मागासवर्गीयांवर अन्याय

महामेट्रोच्या नोकर भरतीत मागासवर्गीयांवर अन्याय

एससी, एसटी, ओबीसींच्या हक्काच्या जागा डावलल्या

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूरच्या महामेट्रोतर्फे झालेल्या नोकर भरती प्रक्रियेत आरक्षण धोरणांची पायमल्ली करण्यात आली असून, एससी, एसटी, ओबीसींच्या संवैधानिक हक्काच्या जागा डावलण्यात आल्या असल्याचा आरोप जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला.

पवार यांनी सांगितले की, महामेट्रोच्या नोकर भरतीची जाहिरात त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. २०१५ पासून २०२१ पर्यंत सुमारे ८८१ पदासाठी जाहिरात देण्यात आली असून, त्यापैकी ४२ पदे एससी, २४ पदे एसटी, ११३ पदे ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकासाठी १२ पदे असून, त्याप्रमाणे नोकर भरती करण्यात आली आहे. पवार म्हणाले, आरक्षण धोरणानुसार विचार केला तर एकूण ८८१ जागांपैकी अनुसूचित जातीच्या १३२ जागा भरायला हव्या होत्या. परंतु महामेट्रोने केवळ ४२ जागा भरल्या. त्याचप्रमाणे अनुसूचित जमातीच्या ६६ लोकांची भरती व्हायला हवी होती. झाली केवळ २४ जणांची. ओबीसींच्या २३८ जागा हव्या होत्या. परंतु ११३ जागा भरल्या. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या ८८ जागा भरायला हव्या होत्या. परंतु केवळ १२ जागा भरल्या. दुसरीकडे मात्र ओपनच्या ३५७ जागा असताना, प्रत्यक्षात मात्र ६९० लोकांची भरती केली. एकूणच मागासवर्गीयांची पदे डावलून ती ओपनला वळती झाल्याचे दिसून येते, असेही पवाार यांनी स्पष्ट केले.

-बॉक्स

एससी, एसटी, ओबीसींच्या संघटना गप्प का?

एससी, एसटी, ओबीसींचे संवैधानिक हक्क डावलले जात आहे. समाजातील तरुण मुलांची हक्काची नोकरीची संधी जाणीवपूर्वक डावलली जात असताना समाजातील संघटना गप्प का? असा सवालही प्रशांत पवार यांनी उपस्थित केला.

Web Title: Injustice on Backward Classes in Mahometro Recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.