दुचाकी अपघातात दाेघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:08 IST2021-01-18T04:08:30+5:302021-01-18T04:08:30+5:30

काेंढाळी : परस्पर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दाेन दुचाकीची समाेरासमाेर धडक लागली. त्यात दाेन्ही दुचाकीचालक गंभीर जखमी झाले. अपघाताची ही ...

Injured in a two-wheeler accident | दुचाकी अपघातात दाेघे जखमी

दुचाकी अपघातात दाेघे जखमी

काेंढाळी : परस्पर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दाेन दुचाकीची समाेरासमाेर धडक लागली. त्यात दाेन्ही दुचाकीचालक गंभीर जखमी झाले. अपघाताची ही घटना काेंढाळी-काटाेल मार्गावरील चक्रीघाट परिसरात रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

दीपक माराेती काैरती (२३, रा. चाेरखैरी सावरगाव) व प्रल्हाद चैतराम राठाेड (४०, रा. गरमसूर, ता. काटाेल) अशी जखमींची नावे आहेत. दीपक काैरती हा आपल्या एमएच-३१/बीएस-७९७० क्रमांकाच्या दुचाकीने काेंढाळीकडून काटाेलकडे जात हाेता. तर प्रल्हाद राठाेड हे एमएच-४९/बी-६३१० क्रमांकाच्या दुचाकीने काटाेलकडून येत हाेता. दरम्यान काेंढाळी-काटाेल मार्गावरील एका वळणावर दाेन्ही दुचाकीची समाेरासमाेर धडक लागली. त्यात दाेन्ही दुचाकीचालक गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच काेंढाळी पाेलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना काेंढाळी प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर जखमींना नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांच्या मार्गदर्शनात पाेलीस उपनिरीक्षक देवेंद्र साेनवणे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Injured in a two-wheeler accident