शेजाऱ्याला केले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:11 IST2021-09-09T04:11:29+5:302021-09-09T04:11:29+5:30

--------------------- जुन्या वादातून युवकावर हल्ला नागपूर : जुन्या वादातून एका युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना हुडकेश्वर येथील ...

Injured neighbor | शेजाऱ्याला केले जखमी

शेजाऱ्याला केले जखमी

---------------------

जुन्या वादातून युवकावर हल्ला

नागपूर : जुन्या वादातून एका युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना हुडकेश्वर येथील घुगली येथे घडली. २१ वर्षीय प्रेमशंकर शंभरकर मंगळवारी रात्री आपल्या मित्रासोबत ग्रीन लॅण्डजवळ पानठेल्यावर सिगारेट ओढत होता. त्याचवेळी विनोद घनश्याम मेश्राम (३०) आणि राजू कौशल गोविंद सिंह चव्हाण (३०), राय सुभाषनगर हे तिथे आले. जुन्या वादातून त्यांनी प्रेमवर हल्ला केला. चाकू व दगडाने वार करून जखमी केले. हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

---------

अपघातात दोघांचा मृत्यू

नागपूर : एका पायी जाणाऱ्यासह दोन लोकांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला.

बुधवारी सकाळी ६.३० वाजता ५५ वर्षीय इसम प्रतापनगरातून सोमलवाड्याकडे पायी जात होता. त्याचवेळी कंटेनर चालकाने त्यांना चिरडले. पायी जाणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. प्रतापनगर पोलिसांनी कंटेनर चालक अशोककुमार पासवान (२३), रा. मिहान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याचप्रकारे फुलेनगर महादुला येथील ६२ वर्षीय नत्थुराम साहू हे ३१ ऑगस्ट रोजी रात्री सायकलने जात होते. कोराडीतील गायकवाड चौकात त्या अज्ञात वाहनाने धडक देऊन जखमी केले. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. कोराडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Injured neighbor