कचऱ्यात सापडला इंजेक्शनचा साठा
By Admin | Updated: October 9, 2015 02:51 IST2015-10-09T02:51:30+5:302015-10-09T02:51:30+5:30
शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा पडला आहे. गरीब रुग्णांना पदरमोड करून औषधे विकत घेण्याची वेळ आली आहे.

कचऱ्यात सापडला इंजेक्शनचा साठा
सुपर स्पेशालिटी रुग्णालय : सीव्हीटीएस विभागातील प्रकार!
सुमेध वाघमारे नागपूर
शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा पडला आहे. गरीब रुग्णांना पदरमोड करून औषधे विकत घेण्याची वेळ आली आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचीही अशीच स्थिती आहे, असे असतानाही रुग्णालयातील हृदय शल्यचिकित्सा विभागातील (सीव्हीटीएस) महत्त्वाच्या इंजेक्शनचा साठा कचऱ्यात सापडल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे, हे इंजेक्शन २०१७ मध्ये कालबाह्य होणार आहे.
अतिविशेषोपचार (सुपर स्पेशालिटी) करणारे महाराष्ट्रातील नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) हे पहिलेच आणि एकमेव शासकीय रुग्णालय आहे. रुग्णालय सुरू झाल्यापासून चांगल्या दर्जांची सेवा मिळत असल्याने रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
हृदयरोग, हृदय शल्यचिकित्सा, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, नेफ्रोलॉजी, युरोसर्जरी या विभागातून रुग्णसेवा सुरू आहे.
चौकशी समिती स्थापन
रुग्णालयांत मोजकाचा औषधांचा साठा असताना कचऱ्यात एक्सपायरी डेट संपण्यापूर्वीचे इंजेक्शन मिळणे, हे धक्कादायक आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती समोर येण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. येत्या सात दिवसांत समिती आपला अहवाल सादर करणार आहे.
- डॉ. मनीष श्रीगिरीवार
विशेष कार्य अधिकारी, सुपर स्पेशालिटी रुग्णालय