पक्ष्यांसाठी ग्राहक कल्याण समितीचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:07 IST2021-04-05T04:07:30+5:302021-04-05T04:07:30+5:30
नागपूर : पाणी हेच जीवन आहे. पाणी नसेल तर जीवन संपुष्टात येईल, त्यामुळे पाण्याचा उपयोग सांभाळून करा आणि मानवाचे ...

पक्ष्यांसाठी ग्राहक कल्याण समितीचा उपक्रम
नागपूर : पाणी हेच जीवन आहे. पाणी नसेल तर जीवन संपुष्टात येईल, त्यामुळे पाण्याचा उपयोग सांभाळून करा आणि मानवाचे तसेच पशुपक्ष्यांचे प्राण वाचवा. सध्या वाढत्या उन्हामुळे प्राणी व पक्ष्यांचे हाल होत आहे. पाण्याविना चिमणी, पाखरे तडफडत आहे. आता प्रत्येकाने पुढाकार घेऊन आपापल्या टेरेसवर पक्ष्यांसाठी सोयीप्रमाणे पाण्याची कुंडी ठेवण्याचे आवाहन ग्राहक कल्याण समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आशिष अटलोए व सदस्य चंद्रकांत चोथे यांनी केले आहे. ग्राहक कल्याण समितीने शेकडो टिनाची पिंपे तयार केली असून त्यामध्ये पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी आणि दाणे ठेवण्यात येणार आहे. हे पिंपे झाडांवर लावण्यात येणार आहेत, जेणेकरून पक्ष्यांना पाणी आणि दाणे घेता येतील. हा उपक्रम समितीतर्फे मागील दोन वर्षांपासून राबविण्यात येत आहे.