शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

विद्यार्थ्यांनी कॅनव्हॉसवर रेखाटली कल्पकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 10:35 PM

विहीरगाव येथील प्रेरणा पब्लिक स्कूलच्या शिक्षकांनी मुलांच्या कल्पकतेला वाव देत, त्यांच्याकडून कॅनव्हॉस रंगवण्याची किमया साधली. त्याच किमयेचे ‘प्रेरणा कॅनव्हॉस पेंटिंग कार्निव्हल’ जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे.

ठळक मुद्देप्रेरणा कॅनव्हॉस पेंटिंग कार्निव्हल : जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळेतील चवथी ते दहावी, हे वय अभ्यासाचेच. खरे सांगायचे तर खेळण्या-बागडण्याचे. मात्र, उज्ज्वल भविष्याच्या अट्टहासात त्यावर विरजण पडते आणि मुले सतत पुस्तकात डोकावलेली असतात. अशा काळात विहीरगाव येथील प्रेरणा पब्लिक स्कूलच्या शिक्षकांनी मुलांच्या कल्पकतेला वाव देत, त्यांच्याकडून कॅनव्हॉस रंगवण्याची किमया साधली. त्याच किमयेचे ‘प्रेरणा कॅनव्हॉस पेंटिंग कार्निव्हल’ जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे. या द्विदिवसीय कार्निव्हलचे उद्घाटन शनिवारी झाले.

शाळेचे संस्थापक एस.सी. गुल्हाने, आर.सी. गुल्हाने व सीईओ अभिलाषा गुडधे यांच्या हस्ते करण्यात आले. कलाशिक्षक सुरेंद्र टाले व प्रणिता भेंडे यांच्या मार्गदर्शनात व प्राचार्य डॉ. सॅम्युअल रॉय आणि शाळा संस्थापक सुरेंद्र गुल्हाने यांच्या प्रोत्साहनातून अभ्यासाच्या तणावातून मनाला तजेला देणाऱ्या कलाकृती साकारण्याची लीला मुलांनी साधली. जवळपास १६० विद्यार्थ्यांनी कॅनव्हॉसवर कल्पनांना विविध रंगछटांची संगत दिली आणि मधुबनी, कालमकारी, क्रिएटिव्ह, लॅण्डस्केप, झिरोलाईन, पोर्ट्रेट, अ‍ॅब्स्ट्रॅक्ट, फ्रीहॅण्ड, नेचर, शॅर्डा अशा विविध शैली कॅनव्हॉसवर रेखाटल्या. मुलांच्या या कलाकुसरी बघून त्यांच्यातील कल्पकतेला कशा तऱ्हेने चालना मिळत गेली असेल, याची जाणीव आपसूकच होते. वर्षभर ‘आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट’च्या तासिकेत मुले स्वत:च्या अभिव्यक्तीला बेमालूम मोकळीक देत असत आणि त्यातून साकारलेल्या या कला जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्ये झळकाव्यात, असे शाळेचे स्वप्न होते. त्याच स्वप्नांची पूर्तता होत असल्याचे कला शिक्षक सुरेंद्र टाले व प्रणिता भेंडे यांनी सांगितले. चित्रांचे हे प्रदर्शन रविवारपर्यंत सुरू असणार आहे.

टॅग्स :painitingsपेंटिंगJawaharlal Darda Art Galleryजवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीStudentविद्यार्थी