महागाई नक्कीच कमी होईल
By Admin | Updated: October 2, 2014 01:10 IST2014-10-02T01:10:17+5:302014-10-02T01:10:17+5:30
केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर अवघ्या १०० दिवसांत पेट्रोलचे दर ७ रुपयांनी कमी झाले आहे. डिझेलसुद्धा २ रुपयांनी स्वस्त झाले आहे. महागाईला कारणीभूत असलेल्या इंधनाच्या

महागाई नक्कीच कमी होईल
भाजपाचा दावा : बुटीबोरीत कार्यकर्ता मेळावा
नागपूर : केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर अवघ्या १०० दिवसांत पेट्रोलचे दर ७ रुपयांनी कमी झाले आहे. डिझेलसुद्धा २ रुपयांनी स्वस्त झाले आहे. महागाईला कारणीभूत असलेल्या इंधनाच्या किमती कमी झाल्यामुळे वस्तूं्च्या किमतीही कमी होतील; परिणामी महागाई नक्कीच कमी होईल, असा विश्वास हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समीर मेघे यांनी बुटीबोरी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केला.
हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समीर मेघे यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित करून प्रचाराला सुरुवात केली आहे. या मेळाव्याला विद्यमान आमदार विजय घोडमारे, दत्ता मेघे, आकाश वानखेडे, बबलू गौतम, रूपराव शिंगणे, प्रेमभाई झाडे, अशोकसिंग गौतम, डॉ. भीमराव म्हस्के, अविनाश गुजर, डॉ. शेळके, वंदना ठाकरे, नंदा गवळी, राजेश तामनपुरे, फारुख शेख, नरेंद्र गौतम, राजू नागपुरे, प्रवीण पाचपोरे, सन्नी चौहान, समीर बोरकटे, राजू करमळकर, दिलीप मस्के, संतोष भोयर, प्रवीण आंबेकर, सतीश जयस्वाल, संजय निस्ताने आदी उपस्थित होते. याप्रसंगी समीर मेघे म्हणाले की, १५ आॅक्टोबरनंतर हिंगणा मतदारसंघात संगणकाचे मोफत प्रशिक्षण देणाऱ्या बसेस सुरू करण्यात येणार आहेत. येथील नागरिकांसाठी अॅम्बुलन्सची व्यवस्था करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी विजय घोडमारे, दत्ता मेघे, आकाश वानखेडे, रूपराव शिंगणे आदींनीसुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रवीण शर्मा तर प्रास्ताविक बबलू गौतम यांनी केले.
बुटीबोरी येथील मेळाव्यानंतर त्यांनी डिगडोह पांडे, देवळी काळबोंडे, गोराला, खैरी सीता, गीदमगड, अडेगाव येथे छोटेखानी सभा घेतल्या. या सभेला प्रभाकर कडू, भूषण कुमार, रुमदेव बुरटकर, माणिकराव मगाम, रामाजी मेश्राम, महादेव कुंभरे, प्रेम जाडे, रमेश ठवळे, विठ्ठल कोवाड, सतीश टेकाडे, संजय ढोणे, भक्तराज भोयर, बाबाराव कोल्हे, राजेश ढोणे, एकनाथ कोल्हे, दिलीप टेकाडे, पुरुषोत्तम वानखेडे, भाऊराव टेकाडे, दादाराव खिडकर, तुकाराम टेकाडे, जयंत सयाम, रमेश गावडे आदी उपस्थित होते. नारायण बोरजवाडे, गणेश देवारे, नीतेश बुरजवाडे, वसंत ठाकरे, रामू ठाकरे, संजय पांढरे, राजू राऊत, सुभाष राऊत, रोशन खंडापे, संजय माहूरकर, बाबूराव बागडे, ईश्वरदास रंगारी, देवीदास माहूरकर, धनराज माहूरकर, रवी जामनेरकर, वासुदेव वाघाडे, चंचल कांबळे, सचिन चौधरी आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)