खतांच्या महागाईमुळे शेती खर्चात दीडपट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:07 IST2021-04-11T04:07:16+5:302021-04-11T04:07:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील काळात सरकारने रासायनिक खतांच्या वापरावर दिलेला भर, त्यासाठी दिलेले प्रोत्साहन यामुळे नैसर्गिक शेतीकडून ...

खतांच्या महागाईमुळे शेती खर्चात दीडपट वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काळात सरकारने रासायनिक खतांच्या वापरावर दिलेला भर, त्यासाठी दिलेले प्रोत्साहन यामुळे नैसर्गिक शेतीकडून शेतकरी रासायनिक शेतीकडे वळला. मात्र लागोपाठ वाढत चाललेल्या खतांच्या किमतींमुळे शेतीचा उत्पादन खर्चही वाढला आहे. अलीकडेच झालेल्या दीडपट दरवाढीमुळे शेतीचा खर्चही दीडपटीने वाढला आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना आता शेती करणे आवाक्याबाहेरचे होणार आहे.
मागील महिन्यात सरकारने खतांच्या किमतीमध्ये वाढ केली होती. आता पुन्हा महिनाभराच्या अंतराने दरवाढ झाली आहे. कंपोस्ट खतांचा वापर कमी झाल्याने आणि उत्पादनातही परिणाम दिसत असल्याने रासायनिक खतांचा वापर मागील काळात वाढला आहे. ही मागणी आणि शेतकऱ्यांची मानसिकता लक्षात घेऊन पुन्हा दरवाढ झाली आहे. कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांची महागडे खत खरेदी करण्याची ऐपत नसल्याने खतांचा वापर कमी झाल्यास हंगामातील उत्पादनात घट येणार आहे.
...
विदर्भात या रासायनिक खतांची मागणी
विदर्भामध्ये साधारण : डीएपी, २०-२०-०-१३, २८-२८-०, १६-२०-०-१३, १४-३५-१४, १५-१५-१५, १२-३२-१६ या रासायनिक खतांचा वापर अधिक होतो. कपाशी, सोयाबीन, हरभरा, तूर, गहू, ज्वारी, धान, उडीद, मूग, बरबटी, तीळ आदी पिकांसाठी ही मागणी मोठ्या प्रमाणावर असते. या सर्वच खतांच्या टनामागे आणि ५० किलोंच्या बॅगमागे दरवाढ झाली आहे.
...
एका पोत्यामागे वाढला ५०० रुपयांचा खर्च
खताच्या एका पोत्यामागे सरासरी ५०० रुपयांचा खर्च वाढला आहे. शेतकरी हेक्टरी सरासरी १० पोती खतांचा वापर करतात.
एका पोत्यावर ५०० रुपयांच्या खर्चाची वाढ गृहीत धरता एका पिकामागे ५ हजारांचा भुर्दंड पडणार आहे. शेतकरी शेतामध्ये किमान तीन ते चार पिके घेतो. हे लक्षात घेता उत्पादन खर्चात होणारी वाढ लक्षात येईल.
...
कोट
डीएपी खतांच्या ५० किलोच्या बॅगमागे दीडपट वाढ झाली आहे. हे नवे दर आवाक्याबाहेरचे असल्याने लहान शेतकऱ्यांनी शेती कशी करावी, हा प्रश्न आहे.
- विठ्ठल उमरेडकर, शेतकरी, धानोली किन्ही
...
...