काटोल, कळमेश्वरात संक्रमण वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:11 IST2020-11-28T04:11:32+5:302020-11-28T04:11:32+5:30

काटोल/कळमेश्वर/हिंगणा/कन्हान : नागपूर जिल्ह्यातील नगर परिषद क्षेत्रात कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढत आहे. शुक्रवारी नागपूर ग्रामीणमध्ये ७९ रुग्णांची भर पडली. ...

Infection is on the rise in Katol, Kalmeshwar | काटोल, कळमेश्वरात संक्रमण वाढतेय

काटोल, कळमेश्वरात संक्रमण वाढतेय

काटोल/कळमेश्वर/हिंगणा/कन्हान : नागपूर जिल्ह्यातील नगर परिषद क्षेत्रात कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढत आहे. शुक्रवारी नागपूर ग्रामीणमध्ये ७९ रुग्णांची भर पडली. काटोल तालुक्यात ८६ नागरिकांची चाचणी करण्यात आली. तीत ९ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील पाॅवर हाऊस येथील (२), लक्ष्मीनगर (३) सरस्वतीनगर, रेवतकर ले-आऊट आणि धंतोली येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. ग्रामीण भागामध्ये कोंढाळी येथे एका रुग्णाची नोंद झाली. पारशिवनी तालुक्यात कांद्री कोविड सेंटर येथे ४८ जणांची चाचणी करण्यात आली. यात दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आता पर्यंत ८३६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यातील ७९८ रुग्ण बरे झाले आहेत. कळमेश्वर तालुक्यात १० रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी नगर परिषद क्षेत्रात ८ तर कळंबी आणि पानउबाळी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.

हिंगणा तालुक्यात शुक्रवारी ११९ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात डिगडोह येथील २ तर इसासनी व टाकळघाट येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. सध्या तालुक्यातील बाधितांची संख्या ३५६३ झाली आहे. यातील ३३५१ रुग्ण बरे झाले आहेत. तालुक्यात आतापर्यंत ८२ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Infection is on the rise in Katol, Kalmeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.