काटोलमध्ये संक्रमण वाढतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:09 IST2020-12-02T04:09:51+5:302020-12-02T04:09:51+5:30
काटोल/हिंगणा/कळमेश्वर/कामठी/कन्हान : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण आटोक्यात आहे. मात्र वर्दळीच्या काटोल आणि हिंगणा तालुक्यात अद्यापही स्थिती आटोक्यात ...

काटोलमध्ये संक्रमण वाढतेय
काटोल/हिंगणा/कळमेश्वर/कामठी/कन्हान : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण आटोक्यात आहे. मात्र वर्दळीच्या काटोल आणि हिंगणा तालुक्यात अद्यापही स्थिती आटोक्यात आलेली नाही. नागपूर जिल्ह्यातील तेरा तालुक्यात सोमवारी ५९ कोरोनाबाधितांची नोंद झाली. यात नागपूर तालुक्यात १५ तर काटोल तालुक्यात १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. काटोल तालुक्यात सोमवारी १३२ नागरिकांची चाचणी करण्यात आली. तीत काटोल शहरात ११ तर ग्रामीणमध्ये दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. काटोल शहरातील पंचवटी येथे (३) तर राठी ले-आऊट, धंतोली, शनिचौक चंडिका मंदिर परिसर, तार बाजार, ऑरेंज प्लाझा, रेल्वे स्टेशन आणि रामदेव बाबा ले-आऊट येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीणमध्ये राजनी आणि लिंगा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
हिंगणा तालुक्यात ७८ नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या. यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. येथे वानाडोंगरी येथे ४ तर डिगडोह येथे एका रुग्णाची नोंद झाली. सध्या तालुक्यातील बाधितांची संख्या ३,५७२ इतकी झाली आहे. यातील ३,३५१ रुग्ण बरे झाले आहेत. तालुक्यात आतापर्यंत ८२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कामठी तालुक्यात केवळ दोन रुग्णांची नोंद झाली. कळमेश्वर तालुक्यात तीन रुग्णांची नोंद झाली. येथे कळमेश्वर शहरात एक तर ग्रामीणमध्ये तेलकामठी येथे दोन रुग्णांची नोंद झाली. पारशिवनी तालुक्यात कांद्री कोविड सेंटर येथे १२ जणांची चाचणी करण्यात आली. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आतापर्यंत ८३७ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यातील ७९८ रुग्ण बरे झाले आहेत.