ग्रामीण भागात संक्रमणाचा दर आताही ११ टक्क्यांवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:08 IST2021-05-25T04:08:48+5:302021-05-25T04:08:48+5:30
सावनेर/काटोल/कळमेश्वर/कुही/रामटेक/हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे; मात्र करण्यात आलेल्या चाचण्याच्या तुलनेत संक्रमणाचा दर अद्यापही ...

ग्रामीण भागात संक्रमणाचा दर आताही ११ टक्क्यांवर!
सावनेर/काटोल/कळमेश्वर/कुही/रामटेक/हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे; मात्र करण्यात आलेल्या चाचण्याच्या तुलनेत संक्रमणाचा दर अद्यापही ११ टक्क्यांच्यावर आहे. त्यामुळे ग्रामीण भागात संक्रमणाचा धोका अद्यापही कमी झालेला नाही. रविवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार तेरा तालुक्यात २०३१ चाचण्यापैकी २२७ (११.१७ टक्के) जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ८ रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात आतापर्यंत १,४०,६३३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यातील १,३१,९९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २२५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ग्रामीण भागात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५,९७५ इतकी आहे.
सावनेर तालुक्यात १९ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील १ तर ग्रामीण भागातील १८ रुग्णांचा समावेश आहे. कुही तालुक्यात विविध केंद्रावर ३०४ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात कुही व वेलतूर येथे प्रत्येकी एक तर मांढळ व तितुर येथे प्रत्येकी दोन रुग्णांची नोंद झाली.
रामटेक तालुत्यात दोन रुग्णांची नोंद झाली. यात शहर आणि ग्रामीण भागात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ६४८० कोरोनाबाधितांची नोंद झाली. यातील ६१९९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २८१ इतकी आहे.
हिंगणा तालुक्यात ४१३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथे ६ , हिंगणा व देवळी काळबांडे येथे प्रत्येकी ३, डिगडोह व रायपूर येथे प्रत्येकी २ तर सुकळी बेलदार, टाकळघाट, चिंचोली पठार व कवडस प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ११,७५७ कोरोनाची लागण झाली आहे. यातील १०,७२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
काटोल तालुक्यात ४७० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील ४ तर ग्रामीण भागातील ७ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण कचारी सावंगा व येनवा केंद्रांतर्गत प्रत्येकी १ रुग्ण तर कोंढाळी केंद्रांतर्गत मोडणाऱ्या गावात ५ रुग्णांची नोंद झाली.
कळमेश्वर तालुक्याला दिलासा
दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसलेल्या कळमेश्वर तालुक्यात रुग्णसंख्येत घट होत आहे. सोमवारी तालुक्यात केवळ ६ रुग्णांची नोंद झाली. यात नांदीखेडा येथे ३, भडांगी (२) तर धापेवाडा येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली.