हिंगणा, रामटेकमध्ये संक्रमण कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:08 IST2020-11-28T04:08:09+5:302020-11-28T04:08:09+5:30
हिंगणा/ रामटेक/ काटाेल/ कळमेश्वर/ माैदा : नागपूर जिल्ह्यातील बहुतांया भागातील काेराेना संक्रमण कमी हाेत असताना हिंगणा व रामटेक तालुक्यात ...

हिंगणा, रामटेकमध्ये संक्रमण कायम
हिंगणा/ रामटेक/ काटाेल/ कळमेश्वर/ माैदा : नागपूर जिल्ह्यातील बहुतांया भागातील काेराेना संक्रमण कमी हाेत असताना हिंगणा व रामटेक तालुक्यात कायम असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात गुरुवारी (दि. २६) विविध ठिकाणी करण्यात आलेल्या टेस्टमध्ये हिंगणा तालुक्यात नऊ, रामटेकमध्ये सहा, काटाेल व कळमेश्वर तालुक्यात प्रत्येकी तीन तर माैदा तालुक्यात काेराेनाचे दाेन नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
हिंगणा तालुक्यात गुरुवारी नऊ नवीन रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ३,५५९ झाली आहे. यातील ३,३५१ रुग्ण काेराेनामुक्त झाले असून, ८२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये तालुक्यातील वानाडाेंगरी शहरातील सहा, डिगडाेह येथील दाेन आणि नीलडाेह येथील एका रुग्णाचा समावेश आहे. रामटेक तालुक्यातही सहा रुग्णांची भर पडली. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ८३९ झाली असून, यातील ७५१ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. शिवाय, ३४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नवीन रुग्णांमध्ये रामटेक शहरातील महात्मा गांधी वाॅर्डमधील एका रुग्णासह तालुक्यातील हेटीटाेला येथील दाेन, पुसदा, नवेगाव व मनसर (माईन्स) येथीन प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
काटाेल व कळमेश्वर शहरात गुरुवारी प्रत्येकी तीन नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. काटाेल शहरात ४६ नागरिकांची टेस्ट करण्यात आली असून, त्यातील तीन जणांना काेराेनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. हे तिन्ही रुग्ण काटाेल शहरातील असून, ग्रामीण भागात गुरुवारी एकाही रुग्णाची नाेंद करण्यात आली नाही. या नवीन रुग्णामध्ये काटाेल शहरातील जानकीनगर, साठाेणे ले-आऊट व आययुडीपी येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. कळमेश्वर तालुक्यातील तीन नवीन रुग्णांपैकी कळमेश्वर-ब्राह्मणी शहर, माेहपा शहर व तालुक्यातील तेलकामठी येथील एक रुग्ण आहे. माैदा तालुक्यात गुरुवारी दाेन नवीन रुग्णांची भर पडल्याने येथील एकूण रुग्णसंख्या ६२१ झाली आहे. यातील ५७० रुग्ण काेराेनामुक्त झाले असून, २६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.