लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवजात बालिकेला कारजवळ टाकून तिच्या आरोपी जन्मदात्यांनी पळ काढला. मनीषनगरात ही निरागस बालिका रविवारी सकाळी आढळून आल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली. अनैतिक संबंधातून या बालिकेचा जन्म झाला असावा आणि आरोपींनी आपले पाप लपविण्यासाठी तिला अशा पद्धतीने उघड्यावर सोडले असावे, अशा प्रकारची चर्चा आहे. दरम्यान, पोलिसांनी ही बालिका ताब्यात घेऊन तिला मेडिकल इस्पितळात दाखल केले. तिच्या आरोपी जन्मदात्यांचा पोलीस शोध घेत आहेत.मनीषनगरात घरकूल सोसायटी आहे. या सोसायटीत आज सकाळी ८ च्या सुमारास एका कारजवळ ही बालिका ठेवून अज्ञात आरोपी पळून गेला. बालिका रडत असल्याचा आवाज ऐकून बाजूची मंडळी गोळा झाली. त्यांनी माहिती दिल्याने बेलतरोेडी पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी बालिकेला ताब्यात घेतले आणि मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल केले. ही बालिका केवळ दोन दिवसांची आहे. तिचा अनैतिक संबंधातून जन्म झाला असावा आणि आपले पाप लपविण्यासाठी तिची विल्हेवाट लावण्यासाठी अशा पद्धतीने हा निरागस जीव उघड्यावर सोडून आरोपी पळून गेले असावे, असा संशय आहे. दरम्यान, पंकज भीमराव गोडघाटे (वय ३७, रा. मनीषनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बालिकेला उघड्यावर सोडून पळ काढणाऱ्यांचा शोध सुरू आहे.
नागपुरात नवजात बालिकेला कारजवळ सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 11:37 IST
नवजात बालिकेला कारजवळ टाकून तिच्या आरोपी जन्मदात्यांनी पळ काढला. मनीषनगरात ही निरागस बालिका रविवारी सकाळी आढळून आल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली.
नागपुरात नवजात बालिकेला कारजवळ सोडले
ठळक मुद्देजन्मदात्यांचा शोध सुरूमनीषनगरात खळबळ