लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन वर्षापासून वाहतुकीच्या कोंडीमुळे त्रस्त असलेल्या नागपूरकरांना एप्रिल महिन्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) बनविण्यात येत असलेला इंदोरा ते दिघोरी उड्डाणपुलाचा फेस-२ (रेशीमबाग ते दिघोरी) एप्रिलपासून सुरू करण्याचा दावा एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या उड्डाणपुलाचे ७३ टक्के काम पूर्णत्वास आले असून, उर्वरित २७टक्के काम पूर्ण झाल्यानंतर जून महिन्यात इंदोरा ते दिघोरीदरम्यान वाहतूक सुरू होणार आहे.
८.९० किमी लांबीचा व १२ मीटर रुंदीचा हा द्विमार्गी, दोन लेनचा उड्डाणपूल दोन टप्प्यांत बांधला जात आहे. पहिला टप्पा कमाल चौक (इंदोरा) ते रेशीमबाग चौक, तर दुसरा टप्पा भांडे प्लॉट चौक ते दिघोरी, असा आहे. पाचपावली येथे दोन आरओबी व आरयूबी प्रस्तावित असून, डागा रुग्णालयाजवळ अप-डाउन रॅम्पचे काम वेगाने सुरू आहे.
अग्रसेन चौकात मेट्रो मार्गाखालून जाणारा उड्डाणपूल आणि अशोक चौकातील एलिव्हेटेड रोटरी ही या प्रकल्पाची अभियांत्रिकी वैशिष्ट्ये ठरत आहेत. या उड्डाणपुलासाठी अत्याधुनिक 'यूएचपीएफआरसी' (अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्स काँक्रीट) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. एनसीसी लिमिटेडकडून काम सुरू असून, हे तंत्रज्ञान टिकाऊपणा, कमी देखभाल आणि अधिक आयुष्य देणारे असल्याचे प्रकल्प व्यवस्थापक तुषार ढोरे यांनी सांगितले.
उड्डाणपुलाचे फायदे
- ५० टक्के वाहतूक कोंडी कमी होईल.
- ३ मोठे आणि ११ लहान जंक्शन, तसेच रेल्वे फाटक यामुळे वारंवार होणारी ट्रॅफिक जामची समस्या सुटणार.
- प्रवासाचा वेळ कमी होऊन इंधन बचत व प्रदूषण नियंत्रण होईल.
- इंदोरा चौक ते सीए रोड, दिघोरी, उमरेड, सरकारी रुग्णालय व बसस्थानकापर्यंतचा प्रवास जलद आणि सोईस्कर होईल.
- फ्लायओव्हरमुळे सुरक्षित व सुरळीत वाहतूक शक्य होईल, तसेच भंडारा व उमरेडकडे जाणारी वाहतूक वेगळी करता येईल.
दृष्टिक्षेपातउड्डाणपुलाची लांबी - ८.९ किलोमीटरउड्डाणपुलासाठी मंजूर निधी - ९९८.२७कोटीआतापर्यंत मिळालेला निधी - ६८४.८८ कोटीउड्डाणपुलाचे एकूण बांधकाम - १३.८२ कोटीउड्डाणपुलाला मंजुरी मिळाली - २७मार्च २०२३करारानुसार उड्डाणपुलाची निर्मिती - ३० जून २०२६
"दाट लोकवस्ती व व्यापारी भागातून मार्ग जात असल्याने बांधकाम मोठे आव्हान ठरले. तरीही दिवस-रात्र काम करून प्रगती साधली गेली. नागपूरकरांनी संयम ठेवला म्हणूनच करारातील मुदतीत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट गाठता आले."- चंद्रकांत सिन्हा, प्रोजेक्ट डायरेक्टर, एनएचएआय
Web Summary : Nagpur's Indora to Dighori flyover's second phase will open in April, offering traffic relief. 73% complete, the full stretch aims for June opening. The 8.9 km flyover promises reduced congestion, travel time, and pollution.
Web Summary : नागपुर में इंदोरा से दिघोरी फ्लाईओवर का दूसरा चरण अप्रैल में खुलेगा, जिससे यातायात में राहत मिलेगी। 73% पूरा, पूरे खंड को जून में खोलने का लक्ष्य है। 8.9 किमी फ्लाईओवर से भीड़, यात्रा समय और प्रदूषण कम होने की उम्मीद है।