शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

नागपुरातील इंदोरा, जुनी मंगळवारी, वाठोड्यातही कोरोनाचा शिरकाव : रुग्णसंख्या ५५९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 12:16 AM

हॉटस्पॉट ठरलेल्या मोमिनपुरा, सतरंजीपुरा व टिमकी या वसाहतीतून मोठ्या संख्येत रुग्ण दिसून यायचे. दरम्यानच्या काळात गोळीबार चौक, गड्डीगोदाम तर आता नाईक तलाव, बांगलादेश व भानखेडा येथे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी नोंद झालेल्या १९ रुग्णांमध्ये एक मनपाचा कर्मचारी आहे. हा रुग्ण वाठोडा या नव्या वसाहतीतील आहे. शिवाय, इंदोरा व जुनी मंगळवारीतही रुग्णाची नोंद झाल्याने नव्या वसाहतींमध्ये कोरोनाचा शिरकाव वाढत चालला आहे. रुग्णांची एकूण संख्या ५५९ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देमनपा कर्मचाऱ्यासह १९ रुग्ण पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हॉटस्पॉट ठरलेल्या मोमिनपुरा, सतरंजीपुरा व टिमकी या वसाहतीतून मोठ्या संख्येत रुग्ण दिसून यायचे. दरम्यानच्या काळात गोळीबार चौक, गड्डीगोदाम तर आता नाईक तलाव, बांगलादेश व भानखेडा येथे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी नोंद झालेल्या १९ रुग्णांमध्ये एक मनपाचा कर्मचारी आहे. हा रुग्ण वाठोडा या नव्या वसाहतीतील आहे. शिवाय, इंदोरा व जुनी मंगळवारीतही रुग्णाची नोंद झाल्याने नव्या वसाहतींमध्ये कोरोनाचा शिरकाव वाढत चालला आहे. रुग्णांची एकूण संख्या ५५९ वर पोहचली आहे.नागपुरात मार्च महिन्यात १६ रुग्ण, एप्रिल महिन्यात १२२ रुग्ण तर मे महिन्यात सर्वाधिक म्हणजे ४०२ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची वाढत्या संख्येने वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. यात नव्या वसाहतींची भर पडत असल्याने सामान्यांमध्ये भीतीचे वातावरणही वाढत आहे. आज वाठोडा येथील गोपालकृष्णनगर येथील २७ वर्षीय मनपाचा कर्मचारी पॉझिटिव्ह आला. सतरंजीपुरा झोनच्या आरोग्य टीममध्ये हा कर्मचारी कर्तव्यावर होता. याचा रुग्ण किंवा संशयित रुग्णाशी थेट संपर्क नव्हता. परंतु तरी तो पॉझिटिव्ह आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या पूर्वी मनपाचा नाईक तलाव येथील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आला होता. आता दुसरा कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसेवेत असलेल्या डॉक्टरांपासून ते कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे.बांगलादेश, नाईक तलाव हॉटस्पॉटमेयोच्या प्रयोगशाळेत आज १४ नमुने पॉझिटिव्ह आले. यात इंदोरा,भानखेडा व जुनी मंगळवारी वसाहतीतील प्रत्येकी एक, मोमिनपुरा येथील आठ, नाईक तलाव व बांगलादेश वसाहतीतून दोन तर एक वाठोडा येथील एक रुग्ण आहे. एम्सच्या प्रयोगशाळेत पाच नमुने पॉझिटिव्ह आले. हे पाचही नमुने नाईक तलाव व बांगलादेश येथील आहेत. आज सात रुग्ण याच वसाहतीतील आहेत. विशेष म्हणजे, गेल्या पाच दिवसांत बांगलादेश व नाईक तलाव वसाहतीतून ३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे ही वसाहत नवीन हॉटस्पॉट ठरत आहे.चार डॉक्टरांसह, ३७ परिचारिका व कर्मचारी क्वारंटाइनसतरंजीपुरा झोनमधील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाचा चार डॉक्टर, तीन परिचारिका, हेल्थ वर्कर, डाटाएन्ट्री ऑपरेटर अशा ३७ लोकांचे नमुने घेण्यात आले. नमुन्यांचा अहवाल येईपर्यंत होम क्वारंटाईन राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. परंतु नमुना निगेटिव्ह येताच कर्तव्यावर परतण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.चार रुग्णांना डिस्चार्जमेयोमधून आज दोन तर मेडिकलमधूनही दोन रुग्णांना सुटी देण्यात आली. मेयोतून बरे झालेल्या रुग्णांमध्ये एक मोमिनपुऱ्यातील पुरुष तर दुसरा रुग्ण गड्डीगोदाम येथील महिला आहे. मेडिकलमधून बरे झालेल्यांमध्ये मोमिनपुरा येथील १० वर्षांचा तर गड्डीगोदाम येथील १२ वर्षांचा मुलगा आहे. आतापर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या ३९० झाली आहे.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित २५२दैनिक तपासणी नमुने ७०२दैनिक निगेटिव्ह नमुने ६८३नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ५५९नागपुरातील मृत्यू ११डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ३९०डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २७५८क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १९१२पीडित-५५९-दुरुस्त-३९०-मृत्यू-११

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर