इंदिरा गांधी जैवविविधता उद्यान लवकरच साकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:07 IST2021-07-20T04:07:19+5:302021-07-20T04:07:19+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात सोमवारी यासंदर्भात बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी विमला आर. मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक नागपूर पी. कल्याणकुमार, ...

इंदिरा गांधी जैवविविधता उद्यान लवकरच साकारणार
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात सोमवारी यासंदर्भात बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी विमला आर. मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक नागपूर पी. कल्याणकुमार, नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंग हाडा, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे आदी उपस्थित होते. या परिसरात योग्य ठिकाणी पाण्याची टाकी उभारण्याकरिता वन विभागाने हिरवी झेंडी दिली आहे. महानगरपालिकेनेदेखील कार्यपूर्तीची तयारी दाखविली आहे, असे या बैठकीत अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दोन भागात होणार काम
नगर वन उद्यान तयार करण्याकरिता दोन भागांमध्ये काम करण्याचे ठरले आहे. प्रथम भागामध्ये रोपवन करणे, रोपवन सभोवताल फेन्सिंग करणे, नगर वन उद्याना सभोवताल संरक्षक भिंत बांधणे, पाण्याची टाकी तयार करणे, टॉयलेट बांधणे याकरिता विशेष प्रवेशद्वार तयार करणे, इत्यादी कामे करण्याचे नियोजन असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठीच्या आवश्यक निधीची तरतूददेखील वनविभाग व जिल्हा प्रशासनामार्फत केली जाणार आहे.