इंडिगोचा पायलट कोसळला; रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच झाला मृत्यू
By सुमेध वाघमार | Updated: August 17, 2023 19:25 IST2023-08-17T19:25:23+5:302023-08-17T19:25:40+5:30
शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पाठविण्यात आले.

इंडिगोचा पायलट कोसळला; रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच झाला मृत्यू
नागपूर : इंडिगोचा एक पायलट जे नागपूरहून पुण्याला विमान चालविणार होते ते गुरुवारी बेशुद्ध होऊन बोर्डिंग गेटवरच कोसळले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. कॅप्टन मनोज सुब्रमण्यम (४०) असे पायलटचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, इंडिगोचे विमान नागपूरहून पुण्याला जाणार होते. या विमानाचे पायलट कॅप्टन मनोज सुब्रमण्यम डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आपत्कालीन सुरक्षा होल्ड परिसरात अचानक कोसळले. विमानतळावर तैनात असलेल्या खासगी रुग्णालयाच्या पथकातील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि त्यांना तातडीने दुपारी १२.३० वाजता ‘किम्स किग्सवे हॉस्पिटल’मध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पाठविण्यात आले. त्यांचे नातेवाइक रात्री उशीरा पोहचणार असल्याने उद्या शुक्रवार मेडिकलमध्येच शवविच्छेदन होणार आहे.