नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचा परिणाम विमानसेवेवरही पडला आहे. प्रवाशांची संख्या घटली आहे. या पार्श्वभूमीवर इंडिगो एअरलाईन्सने उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन पर्याय शोधला आहे. या सेवेला त्यांनी ६ ई-बॅगपोर्ट असे नाव दिले आहे.. सध्या ही सेवा हैद्राबादमध्ये १ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. यानंतर मुंबई व बंगळुरु येथेही ही सेवा सुरू होणार आहे. पुढच्या टप्प्यात ही सेवा नागपूरसह देशातील इतर विमानतळावरूनही सुरू केली जाईल. या सेवेच्या माध्यमातून प्रवासी शुल्क भरून आपले सामान बूक करू शकतात. बूक केलेले सामान प्रवाशांना घरपोच उपलब्ध होती. विशेष म्हणजे, उत्पन्न वाढविण्यासाठी रेल्वेनेसुद्धा अतिरिक्त मालवाहतूक सेवा सुरू केली तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानेसुद्धा काही बस मालवाहतूक वाहन म्हणून चालविण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नव्हे तर पोस्ट खात्यानेही अशी सेवा सुरू केली आहे.
इंडिगोने सुरु केली ६ ई-बॅगपोर्ट सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:06 IST