भारतातील पहिली मिस ट्रान्सजेंडर वीणा शेंद्रेने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 14:05 IST2019-03-20T14:05:05+5:302019-03-20T14:05:34+5:30
भारतातील पहिली मिस ट्रान्सजेंडर (तृतीयपंथी) वीणा शेंद्रे हिने छत्तीसगड राज्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

भारतातील पहिली मिस ट्रान्सजेंडर वीणा शेंद्रेने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
ठळक मुद्देछत्तीसगडमध्ये काँग्रेस प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: भारतातील पहिली मिस ट्रान्सजेंडर (तृतीयपंथी) वीणा शेंद्रे हिने छत्तीसगड राज्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अलीकडेच थायलंड येथील पट्टायामध्ये झालेल्या तृतीयपंथियांच्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत तिने भाग घेतला होता. यापूर्वीही अनेक तृतीय पंथियांनी राजकारणात प्रवेश करून निवडणुका जिंकल्या आहेत. वीणा शेंद्रेला समाजकार्याची आवड असून, पक्षाच्या माध्यमातून आपण समाजातील दुर्बल घटकांची सेवा करू इच्छितो असे म्हटले आहे. निवडणुकीत उभे राहण्याबाबत त्यांनी अद्याप काही प्रतिक्रिया दिलेली नाही.