शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
4
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
5
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
6
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
7
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
8
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
9
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
10
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
11
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
12
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
13
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
14
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
15
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
16
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
17
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
18
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
19
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

भारतात पहिली मोफत मानसिक आरोग्य हेल्पलाइन सुरू ; तणावाने त्रस्त डॉक्टर्ससाठी दिलासा

By सुमेध वाघमार | Updated: August 21, 2025 18:38 IST

Nagpur : वैद्यकीय विद्यार्थी, डॉक्टरांसाठी आता मानसिक आरोग्य हेल्पलाइन

नागपूर: देशातील वैद्यकीय क्षेत्रात वाढलेल्या कामाच्या ताणामुळे अनेक विद्यार्थी आणि डॉक्टरांवर मानसिक दबाव वाढत आहे, ज्यामुळे काहीजण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत. या गंभीर समस्येवर उपाय म्हणून, देशभरातील निवासी डॉक्टरांची राष्ट्रीय संघटना 'फेडरेशन आॅफ आॅल इंडिया मेडिकल असोसिएशन' (फायमा) यांनी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. त्यांनी वैद्यकीय विद्यार्थी आणि डॉक्टरांसाठी पूर्णपणे मोफत आणि समर्पित मानसिक आरोग्य हेल्पलाइन सुरू केली आहे. हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असल्याचे मानले जात आहे.    

गेल्या काही वर्षांपासून देशभरात डॉक्टरांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नागपूरच्या ‘एम्स’मधील एका हुशार विद्यार्थ्याच्या आत्महत्येची नुकतीच झालेली घटना किंवा मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलमधील एका निवासी डॉक्टरने अटल सेतूवरून उडी मारून केलेली आत्महत्या या घटनांनी संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडले आहे. या वाढत्या तणावामुळे होणाºया आत्महत्या थांबवण्यासाठी ‘फायमा’ने पुढाकार घेतला आहे. ही हेल्पलाइन वैद्यकीय विद्यार्थी आणि निवासी डॉक्टरांसाठी एक संजीवनी ठरणार आहे. 

५० हून अधिक मानसोपचार तज्ज्ञया हेल्पलाइनमध्ये सुमारे ५० पेक्षा जास्त मानसोपचार तज्ज्ञ आपली सेवा देणार आहेत. यामुळे मदतीची गरज असलेल्या प्रत्येकापर्यंत वेळेवर पोहोचणे शक्य होणार आहे.

आठ भाषांमधून संवादमराठी, हिंदी, इंग्रजी, बंगाली, तेलगू, कन्नड, तामीळ आणि मल्याळम या आठ भाषांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे, ज्यामुळे देशभरातील कोणत्याही भागातील विद्यार्थी आणि डॉक्टर त्यांच्या मातृभाषेत संवाद साधू शकतील.

दिवसाला २० तास सेवाही हेल्पलाइन आठवड्यातील सातही दिवस, दररोज २० तास कार्यरत असेल. यामुळे गरजू व्यक्तीला रात्री-अपरात्रीही मदत मिळू शकेल. ‘फायमा’चे माजी राष्ट्रीय सचिव डॉ. सजल बन्सल यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडली. डॉ. मनीष जांगडा आणि डॉ. अक्षय डोंगरदिवे यांच्या नेतृत्वाखाली ही टीम कार्यरत आहे. झारखंडचे डॉ. जयदीप चौधरी, महाराष्ट्राचे डॉ. सजल बन्सल आणि आंध्रचे डॉ. श्रीनाथ हेल्पलाइनचे समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. 

हेल्पलाइनची माहिती विद्यार्थ्यांपर्यंतहा अभिनव उपक्रम वैद्यकीय क्षेत्रातील तणाव कमी करून, मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. ‘फायमा’चे डॉ. रोहन कृष्णन, डॉ. सुरवानकर दत्ता, डॉ. संदीप डागर आणि इतर सदस्य या हेल्पलाइनची माहिती प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आणि निवासी डॉक्टरांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यHealthआरोग्यnagpurनागपूर