शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

भारतीय संघातील ‘गोलकीपर’च्या वडिलांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 8:46 PM

भारतीय हॉकी संघाचा ‘गोलकीपर’ आकाश चिकटे याच्यावरील मोठे संकट दूर करुन शहरातील ‘न्यूरोसर्जन’ डॉ. प्रमोद गिरी यांनी एक आदर्श उदाहरणच सादर केले आहे.

ठळक मुद्देडॉ. प्रमोद गिरी यांनी दिला अडचणीच्या वेळी आधार : आकाश चिकटेच्या कुटुंबीयांसाठी ठरले ‘देवदूत’

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : तो आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारा, आपल्या बचावकौशल्याने भल्याभल्यांचे ‘गोल’ रोखणारा, प्रसंगी ‘हॉकी स्टीक’च्या प्रहाराची तमा न बाळगता देशासाठी अडथळे, जखमांची पर्वा न करता खेळणारा. परंतु वडिलांच्या आयुष्याच्या बचावाची वेळ आली तेव्हा मात्र त्याच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला तो आर्थिक आधाराचा. परंतु खेळाडूंची समर्पण भावना जाणणाऱ्या नागपुरातील एका वैद्यकीय तज्ज्ञाने या खेळाडूला केवळ आधारच दिला नाही, तर त्याच्या वडिलांच्या जीवावरील संकटदेखील दूर केले. भारतीय हॉकी संघाचा ‘गोलकीपर’ आकाश चिकटे याच्यावरील मोठे संकट दूर करुन शहरातील ‘न्यूरोसर्जन’ डॉ. प्रमोद गिरी यांनी एक आदर्श उदाहरणच सादर केले आहे.आकाश चिकटे हा मूळचा यवतमाळजवळील लोहारा या गावचा असून त्याचे वडील अनिल हे ‘वेल्डिंग’चे काम करतात. त्यांना ‘अ‍ॅन्युरिस्म’ नावाच्या मेंदूच्या आजाराने ग्रासले. त्यांना तातडीने उपचारांची आवश्यकता होती व त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित होता. बुधवारी याची माहिती मिळाली तेव्हा आकाश पुण्याला होता. यवतमाळमधील इस्पितळातील डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्याच्या वडिलांना नागपुरात आणण्यात आले. आकाश हा आंतरराष्ट्रीय खेळाडू असल्याचे कळताच डॉ. प्रमोद गिरी यांनी स्वत: पुढाकार घेतला व चिकटे कुटुंबीयांना आधार दिला. आर्थिक तंगीत असलेल्या आकाशसमोर पैसे कुठून उभे करावे, असा प्रश्न होता. मात्र डॉ.गिरी यांनी यातदेखील त्याच्या डोक्यावरील तणाव दूर केला व शस्त्रक्रिया मोफत करण्याचे ठरविले. डॉ.गिरी यांनी यशस्वीपणे त्याच्या वडिलांवर शस्त्रक्रिया केली व ते आता धोक्याबाहेर आहेत. त्यांच्यावर डॉ. गिरी हे स्वत: जातीने लक्ष ठेवून आहेत.आकाशने देशाला गौरव प्राप्त करून दिला आहे. २०१६ मधील आशिया चषक स्पर्धेतील विजेत्या संघाचा तो सदस्य होता व विशेष म्हणजे त्याला ‘गोलकीपर आॅफ द टू़र्नमेन्ट’ हा पुरस्कारदेखील मिळाला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय सैन्यातदेखील आहे. खेळाडूंचा सन्मान करणे आपली जबाबदारीच आहे व याच भावनेतून मी उपचार केले, असे मत डॉ.प्रमोद गिरी यांनी व्यक्त केले. डॉ.गिरी यांच्या मदतीची फेड करणे शक्यच नाही. संकटाच्या वेळी ते देव म्हणून धावून आले. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी मी माझ्या खेळावर आणखी मेहनत करेन व देशाला आणखी गौरव प्राप्त करुन देईल, अशी भावना आकाश चिकटे याने व्यक्त केली.

टॅग्स :doctorडॉक्टरHockeyहॉकी