शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय सिनेमात हवे ’डायव्हर्सिटी व रिप्रेझेंटेशन’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 23:35 IST

जातीभेद हा भारतीय समाजात आजही आहे. सिनेमातही तो अपवाद सोडला तर आहेच. त्यामुळेच भारतीय सिनेमा आजही ग्लोबल होऊ शकलेला नाही. म्हणून भारतीय सिनेमाला खऱ्या अर्थाने ग्लोबल व्हायचे असेल तर सिनेमांमध्ये विविधता (डायव्हर्सिटी) व प्रतिनिधित्व (रिप्रेझेंटेशन) आवश्यक आहे, असे मत ‘बॅटल आॅफ भीमा कोरेगाव’ या डॉक्युमेंट्रीचे दिग्दर्शक सोमनाथ वाघमारे यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देचित्रपट महोत्सव : डॉक्युमेट्री दिग्दर्शक सोमनाथ वाघमारे यांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जातीभेद हा भारतीय समाजात आजही आहे. सिनेमातही तो अपवाद सोडला तर आहेच. त्यामुळेच भारतीय सिनेमा आजही ग्लोबल होऊ शकलेला नाही. म्हणून भारतीय सिनेमाला खऱ्या अर्थाने ग्लोबल व्हायचे असेल तर सिनेमांमध्ये विविधता (डायव्हर्सिटी) व प्रतिनिधित्व (रिप्रेझेंटेशन) आवश्यक आहे, असे मत ‘बॅटल आॅफ भीमा कोरेगाव’ या डॉक्युमेंट्रीचे दिग्दर्शक सोमनाथ वाघमारे यांनी येथे व्यक्त केले.दीक्षाभूमी येथे बुद्ध महोत्सवांतर्गत सुरू असलेल्या चित्रपट महोत्सवात सोमवारी विनादे कांबळे यांची ‘पोस्टमार्टम’ आणि ‘द बॅटल आॅफ भीमा कोरेगाव’ही सोमनाथ वाघमारे यांनी तयार केलेली डॉक्युमेंट्री फिल्म दाखवण्यात आली. यानंतर वाघमारे व कांबळे यांनी नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरेही दिली. यावेळी फिल्म फेस्टिव्हलचे संयोजक अजय ढोके प्रामुख्याने उपस्थित होते.सोमनाथ वाघमारे म्हणाले, भारतीय सिनेमांमध्ये दलित, बहुजनांचे विषय केवळ असहाय्य, दया या भानेतून दाखविले जातात. त्यांची शूरता, त्यांचे साहस, नेतृत्व म्हणजेच मुख्य हिरो, मुख्य कथा या स्वरूपात ती दाखवली जात नाही. कारण चित्रपट तयार करणारी मंडळी कोण हे महत्त्वाचे आहे. अपवादात्मक आता नागनाथ मंजुळेसारखे आंबेडकरी विचारांतून आलेले दिग्दर्शक ही उणीव भरून काढत आहेत. बहुजन आंबेडकरी लोकांमध्ये गुणवत्ता आहे, त्यांना संधी मिळाली तर काय होऊ शकते, हे नागनाथ मंजुळे यांनी दाखवून दिले आहे. तेव्हा चित्रपटाच्या क्षेत्रात आंबेडकरी बौद्ध व बहुजन समाजातूनही युवकांनी यावे आणि चांगली कलाकृती साकारावी, असे आवाहनही त्यांनी केले.पुढील डॉक्युमेंट्री ‘गेल आॅमवेंट’ यांच्या जीवनावरसध्या ‘गेल आॅमवेंट’ यांच्या जीवनावर डॉक्युमेंट्री तयार करीत आहे. विदेशातून भारतात आलेल्या गेल यांनी आपले संपूर्ण जीवन आंबेडकरी विचाराला वाहून घेतले आहे. त्यांच्या जीवनावरील डॉक्युमेंट्री ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. आज श्याम बेनेगल यांचा ‘मंथन’बुद्ध महोत्सवातील चित्रपट महोत्सवाचा समारोप मंगळवारी २० फेब्रुवारी रोजी होईल. यावेळी श्याम बेनेगल दिग्दर्शित मंथन हा चित्रपट दुपारी ३ वाजता दाखवण्यात येईल. यानंतर सायंकाळी ५.१५ वाजता जीजस इन कश्मीर, सायंकाळी ६.३० वाजता ‘माँक व्हिथ अ कॅमेरा’ आणि अनमिस्टेक चाईल्ड हे चित्रपट दाखविण्यात येतील.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीFairजत्रा