शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारत परत विश्वगुरू बनणार : राजयोगी ब्रह्मकुमार करुणाभाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:10 IST

भारताची संस्कृती व जीवनपद्धती पाहून विदेशी लोकदेखील प्रभावित झाले आहेत. देशाच्या संस्कृतीचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. ब्रह्मकुमारीज् परिवारातील १० लाखांहून अधिक लोक आपल्या जीवनातून भारतीय संस्कृती दाखवत आहेत. भारत परत एकदा विश्वगुरू बनण्यास सज्ज आहे व यात सर्वांनी हातभार लावला पाहिजे, असे मत ब्रह्मकुमारीज्च्या मीडिया विंगचे अध्यक्ष राजयोगी बीके करुणाभाई यांनी व्यक्त केले. ब्रह्माकुमारीज्च्या जामठास्थित विश्व शांती सरोवर येथे बुधवारी नवीन भारताच्या स्थापनेत मीडियाचे योगदान या विषयांतर्गत मीडिया महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटनानंतर ते बोलत होते.

ठळक मुद्देमीडिया महासंमेलनाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारताची संस्कृती व जीवनपद्धती पाहून विदेशी लोकदेखील प्रभावित झाले आहेत. देशाच्या संस्कृतीचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. ब्रह्मकुमारीज् परिवारातील १० लाखांहून अधिक लोक आपल्या जीवनातून भारतीय संस्कृती दाखवत आहेत. भारत परत एकदा विश्वगुरू बनण्यास सज्ज आहे व यात सर्वांनी हातभार लावला पाहिजे, असे मत ब्रह्मकुमारीज्च्या मीडिया विंगचे अध्यक्ष राजयोगी बीके करुणाभाई यांनी व्यक्त केले. ब्रह्माकुमारीज्च्या जामठास्थित विश्व शांती सरोवर येथे बुधवारी नवीन भारताच्या स्थापनेत मीडियाचे योगदान या विषयांतर्गत मीडिया महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटनानंतर ते बोलत होते.प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाची सहयोगी संस्था राजयोग एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च फाऊंडेशनच्या मीडिया विभागातर्फे ओमशांति मीडिया या पाक्षिकाला २१ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्य वक्ता म्हणून साधना पथ साप्ताहिकाचे माजी संपादक बी.के.अनुज, ओम शांती मीडियाचे चीफ एडिटर बीके.गंगाधर, धनवटे नॅशनल कॉलेजच्या जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ.बबन नाखले प्रामुख्याने उपस्थित होते. नाव वेगवेगळे असले तरी ईश्वर एक आहे. विश्व हेच एक कुटुंब आहे, ही संकल्पना ब्रह्माकुमारीज् १९३६ पासून मांडत आहे. भारत अविनाशी खंड आहे. भारतीय संस्कृतीच्या आधारावरच हे म्हणण्यात येते की भारत होता, आहे आणि असेल. भारतीय शिक्षण पद्धती ही गुरुकुल स्वरूपाची राहिली आहे. वर्तमान स्थितीतील शिक्षण पद्धतीत अनेक दोष आहेत. शरीर हेच मंदिर आहे हे कुणीच शिकवत नाही, असे बीके करुणाभाई म्हणाले.पत्रकारिता आणि आध्यात्मिकता वेगवेगळे राहू शकत नाही. आपल्याकडे जगातील प्रत्येक गोष्ट आहे. मात्र मनातील वृत्ती बदलणे आणि मनातील वैरभावनेला दूर करून शुद्ध करणे हे शक्य झालेले नाही. जर आपल्या मनात जगाच्या कल्याणाची भावना असेल तर लेखनीतदेखील तशीच शक्ती प्राप्त होईल, असे प्रतिपादन बी.के.गंगाधर यांनी केले. नवीन भारताच्या निर्माणात मीडियाचे मौलिक योगदान आहे. कायदे आपण बदलू शकत नाही, मात्र त्याला नैतिकतेमध्ये बदलू शकतो. केवळ परमात्माच आपल्याला सुरक्षा देऊ शकतो, असे मत अनुजभाई यांनी व्यक्त केले.नागपूर सेवाकेंद्राच्या संचालिका राजयोगिनी रजनी दीदी व डॉ.बबन नाखले यांनीदेखील मत मांडले. बीके रक्षा दीदी यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन बीके वर्षाबहन व बीके अनुजभाई यांनी केले. बीके मनीषा दीदी यांनी राजयोगाची अनुभूती सर्वांना करवून दिली. बीके प्रेमप्रकाश यांनी आभार मानले.

टॅग्स :IndiaभारतTeacherशिक्षकMediaमाध्यमे